ट्विंकलींग स्टार शाळेत गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम

ट्विंकलींग स्टार शाळेत गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम
बीड/वार्ताहर
आज दिनांक,१३/०७/२२,बुधवार रोजी बीड येथील ट्विंकलींग स्टार ,(शाहूनगर) येथे गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम घेण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंकट्स्वामी कॉलेजच्या प्राध्यापिका सौ. खोसे मॅडम या उपस्थित राहिल्या. तसेच सौ. मीनाक्षी कडवटकर सेवानिवृत्त शिक्षिका, (किनवट) या देखील उपस्थित राहिल्या.यावेळी कार्यक्रमाचे. नियोजन शाळेचे इन्चार्ज सौ.राखी सचदेव मॅडम व सौ. स्नेहल पाटोदकर मॅडम यांनी केले व सूत्रसंचालन सौ. सविता गंदे मॅडम यांनी केले.यावेळी दुसरीतील विद्यार्थिनी ईशानी ढाकणे ,मानवी नहार, प्रांजली परतुडकर, विधी राऊत ,आरोही जोजारे, दिया राऊत, स्वरा म्हेत्रे, निशा गोरवडकर ,स्नेहा वरवडे, शाश्वती काकडे, सृष्टी निर्मळ, नंदिनी मोठे यांनी मिलिंद सर यांच्या नेतृत्वामध्ये नृत्य सादर केले. तसेच शिक्षिका प्रियांका लाड, कीर्ती जाधव ,मनीषा मॅडम, सरिता कुलकर्णी यांनीही अभंग गीत सादर करून शुभेच्छा दिल्या .तसेच चौथीतील विद्यार्थिनी तू तूबा बेग, स्वराली कदम, संस्कृती घाडगे या विद्यार्थिनीने देखील गुरूपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. तसेच चौथीतील विद्यार्थी तन्मय साळवे, तन्मय कांबळे, आदित्य कलासे, विराज मस्के ,सत्यम जगताप यांनी हे नाटक सादर केले व सर्वात शेवटी कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने पूनम वाघमारे मॅडमने केली.








