महेदवीया मस्जीद बनवू न देणारा नासेर भारत सोडून गेला !

महेदवीया मस्जीद बनवू न देणारा नासेर भारत सोडून गेला !
मस्जीदच्या जीर्णोद्धारासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे - एस.एम.युसूफ़
बीड/प्रतिनिधी
शहरातील जुना बाजार भागात असलेल्या लोहार गल्ली मध्ये महेदवीया मस्जीद बनवू न देणारा नासेर पोलिसांची दिशाभूल करून भारताबाहेर निघून गेल्याने महेदवीया मस्जीद च्या जिर्णोद्धारासाठी अजून विलंब होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने जमाअ्त ए महेदवीया ला सहकार्य करावे. अशी विनंती एल.एम.एम.ग्रुप ग्लोबल संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहरात जुना बाजार भागातील लोहार गल्ली मध्ये जमाअ्त ए महेदवीया च्या मस्जीद ची जागा आहे. जिथे पूर्वी मस्जीद अस्तित्वात होती. परंतु मस्जीद च्या बाजूला राहणाऱ्या नासेर ने काही वर्षांपूर्वी महेदवीया जमाअ्तची मस्जीद बंद करून टाकली. त्यावेळी लोहार गल्ली मध्ये राहणाऱ्या अवघ्या तीन महेदवी कुटुंबीयांनी त्यास विरोध केला नाही. यामुळे तेव्हापासून आतापर्यंत महेदवीया मस्जीद चे पूर्ण बांधकाम पडून आता फक्त भिंतीचे अवशेष उरले आहेत. सदरील मस्जीद च्या जागी एल.एम.एम.ग्रुप ग्लोबल संघटना महेदवीया मस्जीद चे बांधकाम करण्यास तयार आहे. परंतु मस्जीद च्या जागेच्या बाजूस राहणारा नासेर यासाठी परवानगी देत नाही. शासनाच्या गॅझेट मध्ये ७७ व्या क्रमांकावर महेदवीया मस्जीद ची नोंद आहे. म्हणून या अगोदर ४ जुलै २०२२ रोजी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याविषयी निवेदन देण्यात आले आहे.
यानंतर बीड शहर पोलीस ठाण्याचे एपीआय घनश्याम अंतरभ यांनी नासेर यास दिनांक ०६ जुलै रोजी पोलीस ठाण्यात बोलावून विचारले असता त्याने त्यांच्यासमोर म्हटले की, *"महेदवीया मस्जीद च्या जागेवर माझा ताबा नाही. मी कुठल्याही प्रकारचे बांधकाम मस्जीद च्या जागेवर केलेले नाही. तसेच मी ०८ जुलै रोजी हज ला चाललो आहे. मी सध्या जायची तयारी करीत आहे. म्हणून याविषयी बोलण्यासाठी किंवा कुठलेही कार्य करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. हज करून आल्यानंतर यांच्या समाजासोबत बसून याविषयी काय करायचे ते बघू."*
त्याने असे म्हटल्याने व हज चे नाव घेतल्याने आणि ही धार्मिक बाब असल्याने एपीआय अंतरभ यांनी नासेर याच्यासह आम्हालाही सांगितले की, ठीक आहे आल्यानंतर तुम्ही आपसात बसून काय तो तोडगा काढा. आणि त्याला जाऊ दिले.
मात्र ०८ जुलै २०२२ ला तो बीड सोडून गेल्यानंतर कळाले की, यावर्षीच्या हज ची सुरुवात तर ०७ जुलै २०२२ पासूनच झालेली आहे. यामुळे हज साठी जाणारे लोक ०७ जुलै च्या अगोदरच मक्का/मदिना येथे पोहोचलेले आहेत. ०८ जुलै रोजी कोणताही व्यक्ती हज करण्यासाठी जाऊ शकत नाही व त्यास धार्मिक आणि सौदी सरकारची सुद्धा परवानगी मिळू शकत नाही. अशी माहिती सौदी अरेबियाच्या सरकारने काढलेल्या हज च्या वेळापत्रकातून समोर आली आहे.
नासेर ने हज ला जात असल्याचा बनाव करून एपीआय अंतरभ यांची दिशाभूल करून पोलीस ठाण्यातून पळ काढला. व ०८ जुलै २०२२ रोजी बीड शहरच नाही तर भारत सोडून सौदी अरेबियातील जद्दाह् येथे निघून गेला असल्याचे कळाले आहे. तिथे त्याचे संपूर्ण कुटुंब वास्तव्यास आहे.
मात्र बीड शहरातील जुना बाजार भागात असलेल्या लोहार गल्लीमधील महेदवीया मस्जीद च्या जागे शेजारी त्याचे जुने घर असून तिथे त्याने भाडेकरू ठेवलेले आहेत. त्या घरात तो किंवा त्याचे कुटुंबीयापैकी कोणीही राहत नाही. शिवाय मस्जीद च्या जागेवर त्याचा कब्जाही नाही, असे त्याने स्वतःहून एपीआय घनश्याम अंतरभ यांच्यासमोर म्हटलेले आहे.
म्हणून महेदवीया मस्जीद ची जागा जमाअ्त ए महेदवीया च्या ताब्यात देण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी. जेणेकरून महेदवीया मस्जीदचे जीर्णोद्धार करण्याच्या कार्यास सुरुवात करता येईल. अशी विनंती एल.एम.एम.ग्रुप ग्लोबल संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.








