13 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

Beed

13 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

बीड/वार्ताहर 

बीड जिल्हयातील जिल्हा व तालुका न्यायालयाच्या सर्व ठिकाणी दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी पक्षकारांनी त्यांची न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटवण्यासाठी येणा-या राष्ट्रीय लोकन्यायालयात ठेवावीत.

 

            सदरच्या राष्ट्रीय लोकन्यायालयात न्यायालयातील सर्व प्रलंबित दिवाणी प्रकरणे ज्यामध्ये दिवाणी दावे, बॅकाची कर्ज वसुली प्रकरणे, कौटुंबीक कलहाची प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, विद्युत महामंडळाची वसुली प्रकरणे, राज्य परिवहन महामंडळची प्रकरणे, मोटार आपघात प्रकरणे इत्यादी व फौजदारी तडजोडजन्य प्रकरणे, धनादेश अनादराची प्रकरणे (कलम 138 एन.आय.ऍक्ट) तसेच दाखलपुर्व प्रकरणे दूरध्वनी देयकाची प्रकरणे, नगरपालीका, ग्रामपंचायत, विद्युत महामंडळ इत्यादीचा सामावेश आहे.   

 

            या राष्ट्रीय लोकन्यायालया मध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी आपले प्रकरणे तडजोडीस ठेवुन समेट घडुन आणावा जेणेकरून त्यांचा वेळ, पैसा व श्रम वाचेल, असे आवाहन श्री. हेमंत शं. महाजन, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड, श्री. सिध्दार्थ ना. गोडबोले, सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड, व मा. श्री. अॅड. एस. एम. नन्नवरे, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ बीड यांनी केले.

Sharing

Visitor Counter