मुखीद लाला यांच्या पाठपुराव्याला यश; १२० घरांचा लाईटीचा प्रश्न लावला मार्गी

मुखीद लाला यांच्या पाठपुराव्याला यश; १२० घरांचा लाईटीचा प्रश्न लावला मार्गी
बीड/वार्ताहर
शहरातील खासबाग तकीया मस्जिद भागातील नागरिकांना वीज पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून तकीया मस्जिद समोरील २०० केवी चा ट्रान्सफार्मर बसविण्यात येणार असुन त्या ट्रान्सफार्मरून दोन नवीन पोल टाकून खासबागेतील जवळपास ९० घरांना कनेक्शन त्या ट्रान्सफार्मरवरून देण्यात येणार आहे .खासबागेचा विद्युत भराचा प्रश्न मार्गी लागणार हे स्पष्ट आहे .सारखी लाईट जात असल्यामुळे किंवा फ्युज जडत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते परंतु नागरिकांचा हा त्रास कमी होईल हे बोलायला हरकत नाही.कारण खासबागेतील ट्रान्सफार्मर चा विद्युत लोड कमी होणार आहे.आज कामाला सुरूवात झाली असुन नवीन दोन पोल टाकण्यात आले व लगेच विद्युत प्रवाह करणारी तार टाकण्यात येणार आहे.मुखीद लाला यांनी पाठपुरावा करून तात्काळ कामास सुरूवात करून घेतलं असल्यामुळे स्थानिक नागरिकांकडून मुखीद लाला यांचा आभार व्यक्त केला जात आहे
जयदत्त अण्णा मंत्री असताना आठ ट्रान्सफार्मर केले मंजुर!
जयदत्त अण्णा मंत्री असताना वार्डातील आठ ट्रान्सफार्मर मंजुर करून घेतले होते .त्यापैकी पाच ट्रान्सफार्मर बसविण्यात आले तर राहिलेले तीन ट्रान्सफार्मर ही लवकरात लवकर बसवून घेणार जेणेकरून वार्डातील नागरिकांना लाईटीचा प्रश्न निर्माण होणार नाही असे मुखीद लाला यांनी म्हटले आहे.








