ज्योत घेवुन जाणाऱ्या भाविकांना भरधाव ट्रॅव्हल्सने उडवले 

Beed

ज्योत घेवुन जाणाऱ्या भाविकांना भरधाव ट्रॅव्हल्सने उडवले 

बीड/प्रतिनिधी 

भरधाव ट्रॅव्हल्सने पायी ज्योत घेवुन जाणाऱ्या भाविकांना उडवल्याने एका भाविकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बीड - गेवराई रोडवरील इटकुर फाटा येथे घडली . या अपघातात अन्य सात ते आठ भाविक जखमी झाले आहेत . अरण येथुन संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्योत घेवुन पायी गेवराई तालुक्यातील गायकवाड जळगांव येथे जात असतांना बीड गेवराई रोडवरील इटकुर फाटा येथे बीडकडुन गेवराईकडे जाणारी ट्रॅव्हल्स क्र : एम.एच.२०.ई.जी .००५५ ने ज्योत घेवुन जाणाऱ्या भाविकांना उडविले . या अपघातात हनुमंत आण्णासाहेब आगरकर ( वय ३६ ) यांचा जागीच मृत्यू झाला तर विशाल आबासाहेब जावळे , विश्वंभर अगरकर , ऋषीकेश परमेश्वर अगरकर , नंदु भाऊसाहेब अगरकर , शैलेश कातखडे , महादेव जावळे , परमेश्वर पांगरे यांच्यासह अन्य काही भाविक जखमी झाले आहेत .

Sharing

Visitor Counter