डोनेशनच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक लुट !

डोनेशनच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक लुट !
बीड/वार्ताहर
बीड शहरातील मिलीया ज्युनिअर कॉलेजमध्ये आकरावीची प्रवेश फी पाच हजार रुपये विद्यार्थ्यांकडून घेण्यात येत असल्याचं विद्यार्थ्यांकडून बोललं जात आहे. तर पैसे घेण्याचे कारण शिक्षकांना विचारले असता प्रवेश कोटा पुर्ण झाला असुन आम्ही तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यातुन प्रवेश देऊ पण त्यासाठी पाच हजार रूपये फी द्यावी लागेल असा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे. खरोखर मिलिया कॉलेज चा कोटा पुर्ण झाला का ? कोठा पुर्ण झाल्याची लिस्ट लावली का?शासकीय कोठा पुर्ण न होता मॅनेजमेंट कोट्यातुन कसं काय प्रवेश देऊ शकता?मॅनेजमेंट कोट्यातुन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पैसे भरल्याची पावती न देता शाॅट मध्ये का पैसे भरल्याची निशाणी केल्या सारख्या खुणा करता? अनुदानित कालेज कीती डोनेशन घेऊ शकतात? शिक्षणाच्या बाजारामध्ये पालकांनी आपल्या मुलांना शिकवायचं कसं ? असे एक ना अनेक प्रश्नाचे उत्तर ...लवकरच बीड प्रसार अंकात पुराव्यासह प्रकाशीत होईल!








