महेबुब नगर, माजलगांव मध्ये विजेचे पोल टाका नसता मशाल मोर्चा काढणार - नाजेर खूरेशी

महेबुब नगर, माजलगांव मध्ये विजेचे पोल टाका नसता मशाल मोर्चा काढणार - नाजेर खूरेशी
माजलगांव/वार्ताहर
शहरामध्ये महेबुब नगर,मनुर रोड, या ठिकाणी विजेचे खांब नाही. ह्या ठिकाणच्या नागरिकांनी आजु- बाजु ठिकाणाहुन विज आणली आहे. परंतु हे अंतर ५०० ते ७०० फुटाचे असल्यामुळे वायर मध्ये स्पारकिंग होत आहे. व विज बंद होत आहे. या स्पार्किंग मुळे जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. व अंतर लांब असल्यामुळे लोकांच्या घरा समोरुन वायर गेल्यामुळे भांडण-तंडे निर्माण होत आहे. व वाद-विवाद वाढत आहे. तरी सर्व बाबींचा आपण गांर्भीयानविचार करुन लवकरात-लवकर विजेचे खांब टाकण्यात यावे. अन्यथा ऑल इंडिया मजलिसे-इत्तेहादुल मुस्लीमीन पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालय समोर दि.०१/०८/२०२२सोमवार रोजी ठिक सायंकाळी ७ वा. मशाल मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा Aimim चे ओबीसी शहराध्यक्ष नाजेर खुरेशी यांनी दिले आहे.








