पैशासाेबतच माणुसकीची श्रीमंती पूर्णवादी अर्थशास्त्र शिकविते

पैशासाेबतच माणुसकीची श्रीमंती पूर्णवादी अर्थशास्त्र शिकविते
पूर्णवादाचे अभ्यासक विनायकराव वझे यांचे प्रतिपादन
बीड/प्रतिनिधी
अर्थार्जन करणे हे प्रत्येकाचे अापले परम कर्तव्य अाहे. कलेकलेने जसे जीवन बदलत असते तसे अर्थविश्वातही बदल घडतात. पैशांसाेबत माणुसकीची श्रीमंती असली पाहिजे, असे पूर्णवादी अर्थशास्त्र शिकविते असे प्रतिपादन पूर्णवादाचे अभ्यासक विनायकराव वझे यांनी केले.
येथील भाग्यनगर भागात अायाेजित करण्यात अालेल्या प्रवचनात त्यांनी डाॅ. रामचंद्र पारनेरकर महाराजांच्या स्वबाेध या ग्रंथातील दशक पहिले समास अाठवा यावर अापले विचार मांडले. वझे म्हणाले की, गुरूंकडून मिळालेली ऊर्जा अापण इतरांना दिली पाहिजे. यासाठी शहरात जर दाेन पेक्षा जास्त मंदिरे असतील तर सर्वच गुरूबंधूंनी एका ठिकाणी एकत्रित येऊन प्रवचनाच्या माध्यमातून अापली बाैद्धीक ऊर्जा वाढवायला पाहिजे. डाॅ. रामचंद्र पारनेरकर महाराज म्हणतात, स्वबाेध म्हणजे स्वत:ला काय बदलून घेता येईल हे पाहणे अाहे. रामदास स्वामींच्या दासबाेध या ग्रंथावर अाधारीत रचना या ग्रंथात अाहे. अर्थ अाणि जीवनाचा काय संबंध अाहे, असे नेहमी विचारले जाते. अापण कुटुुंब प्रमुख म्हणून अार्थिकदृष्ट्या कमकुवत असू असे झाले तर काय हाेईल. त्यामुळे प्रत्येक गृहस्थाला उत्तम संसार करण्यासाठी अर्थार्जन करणे अावश्यक अाहे.
पूर्णवादी अर्थशास्त्रामध्ये प्रत्येकाला माेफत अन्न हे तत्त्व मांडलेले अाहे. प्रत्येकजण हा अन्नाचा हक्कदार अाहे. तुम्हाला अन्न मिळेल पण ते अन्न पचविण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे. जीवनाचा अर्थ त्याला कळला पाहिजे, त्यासाठी अर्थ महत्त्वाचा अाहे हे ही कळले पाहिजे यालाच पूर्णवाद म्हणतात.
विनायकराव वझे यांनी जागतिक पातळीवरील अर्थशास्त्राचाही उल्लेख करीत अनेक उदाहरणासह पूर्णवादी अर्थशास्त्र किती महत्त्वाचे हे सांगितले. यावेळी जीवनकला मंडळाचे कार्याध्यक्ष अशाेक काका महाजन यांनी अाता लाॅकडाऊन उठल्यामुळे पुन्हा एकदा नव्या जाेमाने कामाला लागले पाहिजे, असे ते म्हणाले. मला पदापेक्षाही काम महत्त्वाचे वाटते असे ते म्हणाले. यावेळी नारी फाेरमच्या नूतन अध्यक्षा साै. सुषमा कुलकर्णी यांनी काम करण्याची ज्याला अावड अाहे त्याला भरपूर सवड असते. त्यामुळे अाता नवीन जबाबदारी अाल्यानंतर सर्वांच्या सहकार्याने अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी राबविले जातील, असे त्या म्हणाल्या.
यावेळी पूर्णवादी अादर्श पूर्णवादी शिक्षक अरुण कुंडलकर यांनी महाराज सद्गुण पाहून जबाबदारी देतात, असे ते म्हणाले. महाराजांकडे रत्नांचा दरबार अाहे अाणि त्यातीलच एक रत्न म्हणजे अशाेक काका महाजन अाहेत असे ते म्हणाले. यावेळी बाेलताना नारी फाेरमच्या नूतन उपाध्यक्षा साै. सुमती पिंगळे म्हणाल्या की, कार्य करत राहणे हे अापले काम अाहे. जाे कार्य करताे ताे कार्यकर्ता असताे. कार्याची अाधी अाखणी करावी लागते. कार्य करून कर्तेपण अनेकदा गुरू दुसऱ्याला देतात. तसेच अापण सुद्धा काम करत राहणे ही गुरूसेवा अाहे. त्यातूनच अापले कर्तृत्व अापल्याला दाखविण्याची संधी मिळते, असे ते म्हणाल्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश पिंगळे यांनी समाराेप करताना शमीच्या झाडावर अज्ञातवासाच्या काळात जशी पांडवांना अापले शस्त्रे झाकून ठेवावी लागली हाेती. तसाच काहीसा प्रकार काेराेनाच्या काळात अनुभवयास अाला. जरी पूर्णवाद परिवारात ‘शाे मस्ट गाे’ या न्यायाने कार्यक्रमाचे अाॅनलाइन का हाेईना नियाेजन हाेत असे मात्र अाता खुल्या वातावरणात कार्यक्रम अतिशय चांगल्या रितीने हाेतील. नवीन कार्यकारीणीचे सर्वच पदाधिकारी अत्यंत जबाबदार असल्यामुळे विविध कार्यक्रमांची रेलचेल हाेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी विश्वविद्या प्रतिष्ठान पारनेरच्या बीड जिल्ह्याच्या प्रमुख साै. वैशाली पैठणकर यांनी या प्रतिष्ठान अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांची माहिती िदली अाणि या प्रतिष्ठानच्या विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचे अावाहन त्यांनी केले. हे गुरू कार्य असल्यामुळे हा अभ्यासक्रम समाज प्रबाेधनासाठी अत्यंत महत्त्वाचा अाहे. सर्वांनी प्रबंध सादर करावेत अाणि त्याचे वाचन वेळेनुसार करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या. प्रारंभी ज्याेती शेटे यांनी अभंग गायन केले. यावेळी बीड जिल्हा नारी फाेरमच्या नुतन कार्यकारीणीच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात अाले.
यावेळी साै. सुषमा कुलकर्णी (अध्यक्ष), साै. सुमती पिंगळे (उपाध्यक्ष), साै. माधवी देशपांडे (कार्याध्यक्ष), साै. ज्याेती शेटे (सचिव), साै. अानंदी महाजन (सहसचिव), साै. प्रभावती भुजबळ (काेषाध्यक्ष), साै. माधुरी शिरापूरकर (सहकाेषाध्यक्ष), साै. मनाेरमा शिरापूरकर (सदस्य), साै. सुनंदा कुंडलकर (सदस्य), साै. शकुंतला गाैरकर (सदस्य), अपर्णा धर्माधिकारी (सदस्य) साै. श्यामल महाजन ( सदस्या) यांचा या नारी फाेरमच्या कार्यकारिणीत समावेश अाहे. त्यांची निवड अाैरंगाबादच्या नारी फाेरमच्या केंद्रीय कार्यकारिणीने केली. यावेळी या नवीन पदाधिकाऱ्यांचा अाणि जीवनकला मंडळाचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष अशाेक काका महाजन यांचा पूर्णवाद परिवाराच्या वतीने शाल, श्रीफळ अाणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात अाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अाणि प्रास्ताविक साै. वैशाली पैठणकर यांनी तर विनायकराव वझे यांनी उपस्थितांचे अाभार मानले. यावेळी सभागृहात वेदमूर्ती सदाशिवराव बेहरे, शिवाजीराव शेटे, दिव्य मराठीचे ब्युराेचिफ दिनेश लिंबेकर, मुरलीधरराव देशपांडे, सुरेश कुळकर्णी चंद्रकांत भुजबळ, किमया पैठणकर अादींसह अनेकजण उपस्थित हाेते.








