भारत निवडणूक आयोगाकडून शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

Beed

भारत निवडणूक आयोगाकडून शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

बीड/वार्ताहर 

भारत निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्यासाठी कार्यक्रम दिनांक 14 जूलै, 2022 रोजी जाहीर केला असून येत्या 1 ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी सुरु होणार आहे. दि. 01 नोव्हेंबर, 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत विभागातील शिक्षक मतदार संघासाठी मतदार यादी तयार करण्यांत येणार आहे. दर सहा वर्षानी होणाऱ्या विधान परिषद सदस्यत्वासाठीच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणूकांसाठी संपूर्ण नव्याने (de-novo) मतदार यादी तयार करण्यात येते. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची पहिली पायरी म्हणून मतदार यादीचे काम हाती घेण्यात येते. त्यासाठी मुदत संपणाऱ्या मतदारसंघाच्या मतदार यादीच्या नोंदणीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला असून 1 ऑक्टोबर 2022 ला कार्यक्रमाची सूचना प्रसिध्द होणार आहे. याच दिवसापासून औरंगाबाद विभागाच्या मतदार संघासाठी मतदार नोंदणी सुरु होणार आहे. 7 नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर 23 नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.

मतदार यादीवर 23 नोव्हेंबर 2022 ते 9 डिसेंबर 2022 या काळात दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. 25 डिसेंबर 2022 ला दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करून त्यांनतर 30 डिसेंबर 2022 ला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. सदर मतदार यादीमध्ये अर्ज नमूना क्र. 19 व्दारे - नाव नोंदणी करावयाची आहे. दावे व हरकती 7 नोव्हेंबरपर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. बीड जिल्ह्यातील 1 नोव्हेंबर, 2022 या अर्हता दिनांकास विहित निकषानूसार पात्र मतदारांनी त्यांचे अर्ज नमुना नं. क्र. 19 मध्ये भरुन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.

Sharing

Visitor Counter