सुंबेवाडी येथे आयसीआयसीआय फाउंडेशन व ग्रामपंचायत चा अनोखा उपक्रम

Beed

सुंबेवाडी येथे आयसीआयसीआय फाउंडेशन व ग्रामपंचायत चा अनोखा उपक्रम

बीड/वार्ताहर 

 जसजसा आंब्याचा मोसम जवळ येतो तसतसा सगळ्यांनाच आंब्याची आठवण होते.पण या आंब्याचा भरपूर आणि मनसोक्त स्वाद घेयचा असेल तर योग्य वेळी झाडांची लागवड करायला हवी हीच संकल्पना मनात ठेवून सुंबेवाडी ता आष्टी जि बीड येथे आयसीआयसीआय फाउंडेशन व ग्रामपंचायत मार्फत एकदम अल्पदरात १० केशरी आंबे व त्यासाठी १० किलो कंपोस्ट खत असे एकूण ३६ शेतकर्यांना ३६० आंब्याची झाडे व ३६० किलो कंपोस्ट खत शुक्रवार दि २९ जुलै रोजी वाटप करण्यात आली.अशा प्रकारे अनेक समाजोपयोगी उपक्रम सुंबेवाडी गावामध्ये फाउंडेशन मार्फत राबविण्यात येत आहेत.यावेळी आयसीआयसीआय फाउंडेशन चे समन्वयक बाळासाहेब कांबळे गावातील सरपंच, उपसरपंच,ग्रा सदस्य,महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter