बीड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर

Beed

बीड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर

बीड/वार्ताहर 

बीड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत प्रक्रिया जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील नियोजन समिती सभागृहात पार पडली. जिल्हा परिषदेची एकूण 69 सदस्यसंख्या आहे. यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती महिला, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमानुसार तसेच चिठ्ठी पध्दतीने सोडतीद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले.

 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, उपजिल्हाधिकारी सामान्य डॉ. दयानंद जगताप, तहसीलदार (महसूल) मंजुषा लटपटे, नायब तहसीलदार अभय जोशी, आणि श्री. आडसूळ, कोषागार अधिकारी गोविंद घोळवे, एस. बी. शेंडगे आदि व्यासपीठावर उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी डॉ. दयानंद जगताप यांनी निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरक्षण सोडतीची सविस्तर माहिती सादरीकरणाव्दारे उपस्थित विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना दिली. काजल रामेश्वर गायकवाड, प्रतीक्षा बाळू धनवे, कवचट ओमराजे दत्तात्रय, शेख बिलाल शेख सलीम आदि विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या हस्ते आरक्षण चिठ्ठी काढण्यात आली.

 

जिल्हा परिषदेचे एकूण 69 निवडणूक विभाग आहे. त्यापैकी स्त्रियांसाठी 35 निवडणूक विभाग आरक्षित आहेत. प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे - अनुसूचित जाती एकूण 9 पैकी स्त्रियांसाठी 5 निवडणूक विभाग आरक्षित, अनुसूचित जमाती एकूण 1 पैकी स्त्रियांसाठी 0 निवडणूक विभाग आरक्षित, नागरिकांचा मागास प्रवर्ग - एकूण 18 पैकी स्त्रियांसाठी 9 निवडणूक विभाग आरक्षित, सर्वसाधारण एकूण 41 पैकी स्त्रियांसाठी 21 निवडणूक विभाग आरक्षित.

 

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित एकूण 18 निवडणूक विभाग -

 

1 रेवकी (ता. गेवराई), 9 पाडळसिंगी (ता. गेवराई), 23 नाळवंडी (ता. बीड), 67 जोगाईवाडी/ चतुरवाडी (ता. अंबेजोगाई), 2 तलवाडा (ता. गेवराई), 16 पात्रुड (ता. माजलगाव), 17 दिंद्रुड (ता. माजलगाव), 33 रायमोह (ता. शिरूर कासार), 34 डोंगरकिन्ही (ता. पाटोदा), 40 बीडसांगवी (ता. आष्टी), 45 अष्टा ह. ना. (ता. आष्टी) 53 तेलगाव (ता. धारूर), 56 पिंपरी बु. (ता. परळी वैजनाथ), 57 सिरसाळा (ता. परळी वैजनाथ), 62 धर्मापुरी (ता. परळी वैजनाथ), 65 पट्टी वडगाव (ता. अंबाजोगाई), 30 मातोरी (ता. शिरूर कासार), 8 मादळमोही (ता. गेवराई).

 

त्यापैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित 9 निवडणूक विभाग – 1 रेवकी (ता. गेवराई), 9 पाडळसिंगी (ता. गेवराई), 23 नाळवंडी (ता. बीड), 67 जोगाईवाडी / चतुरवाडी (ता. अंबेजोगाई), 2 तलवाडा (ता. गेवराई), 34 डोंगरकिन्ही (ता. पाटोदा), 40 बीडसांगवी (ता. आष्टी), 30 मातोरी (ता. शिरूर कासार), 56 पिंपरी बुद्रुक (ता. परळी वैजनाथ)

 

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित एकूण 9 निवडणूक विभाग - 13 किट्टी आडगाव (ता. माजलगाव), 48 होळ (ता. केज), 54 भोगलवाडी (ता. धारूर), 12 मोगरा (ता. माजलगाव), 24 पिंपळनेर (ता. बीड), 29 चौसाळा (ता. बीड), 6 उमापूर (ता. गेवराई), 44 मुर्शदपूर (ता. आष्टी), 66 बर्दापूर (ता. अंबाजोगाई)

त्यापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित 5 निवडणूक विभाग –6 उमापूर (ता. गेवराई), 44 मुर्शदपूर (आष्टी), 54 भोगलवाडी (ता. धारूर), 24 पिंपळनेर (ता. बीड), 13 किट्टी आडगाव (ता. माजलगाव).

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित एकूण 1 निवडणूक विभाग – 60 जिरेवाडी (ता. परळी वैजनाथ), त्यापैकी महिलांसाठी आरक्षित निवडणूक विभाग – 0,सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित एकूण 41 निवडणूक विभाग – 25 ताडसोना (ता. बीड), 31 पाडळी (ता. शिरूर कासार), 37 सौताडा (ता. पाटोदा), 38 दौला वडगाव (ता. आष्टी), 41 धानोरा (ता. आष्टी), 47 आडस (ता. केज), 55 आसरडोह (ता. धारूर), 68 चनई (ता. अंबेजोगाई), 4 गढी (ता. गेवराई), 11 सादोळा (ता. माजलगाव), 50 चिंचोली माळी (ता. केज), 58 टोकवाडी (ता. परळी वैजनाथ), 5 धोंडराई (ता. गेवराई), 14 टाकरवण (ता. माजलगाव), 26 पाली (ता. बीड), 61 दाऊतपूर (ता. परळी वैजनाथ), 64 घाटनांदूर (ता. अंबेजोगाई), 3 जातेगाव (ता. गेवराई), 7 चकलांबा (ता. गेवराई), 15 तालखेड (ता. माजलगाव), 20 चिखलबीड (ता. वडवणी), 21 राजुरी नवगण (ता. बीड), 22 बहिरवाडी (ता. बीड), 28 नेकनूर (ता. बीड), 35 तांबा राजुरी (ता. पाटोदा), 46 विडा (ता. केज), 49 नांदुरघाट (ता. केज), 59 नागापूर (ता. परळी वैजनाथ), 69 पाटोदा म (ता. अंबाजोगाई), 43 कडा (ता. आष्टी), 52 बनसारोळा (ता. केज), 10 रुई (ता. गेवराई), 18 कवडगाव (ता. वडवणी), 19 उपळी (ता. वडवणी), 32 पिंपळनेर (ता. शिरुर कासार), 36 अंमळनेर (ता. पाटोदा), 42 लोणी (स.) (ता. आष्टी), 51 युसुफ वडगाव (ता. केज), 63 मोरेवाडी (ता. अंबाजोगाई), 39 धामणगाव (ता. आष्टी), 27 लिंबागणेश (ता. बीड),

 

त्यापैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित एकूण 21 निवडणूक विभाग – 25 ताडसोना (ता. बीड), 31 पाडळी (ता. शिरूर कासार), 37 सौताडा (ता. पाटोदा), 38 दौला वडगाव (ता. आष्टी), 41 धानोरा (ता. आष्टी), 47 आडस (ता. केज), 55 आसरडोह (ता. धारूर), 68 चनई (ता. अंबेजोगाई), 4 गढी (ता. गेवराई), 11 सादोळा (ता. माजलगाव), 50 चिंचोली माळी (ता. केज), 58 टोकवाडी (ता. परळी वैजनाथ), 5 धोंडराई (ता. गेवराई), 14 टाकरवण (ता. माजलगाव), 26 पाली (ता. बीड), 61 दाऊतपूर (ता. परळी वैजनाथ), 64 घाटनांदूर (ता. अंबेजोगाई), 21 राजुरी नवगण (ता. बीड), 22 बहिरवाडी (ता. गेवराई), 46 विडा (ता. केज), 59 नागापूर (ता. परळी वैजनाथ).

 

 

 

 

Sharing

Visitor Counter