३५ वर्षात विकास केले असता तर आज गल्लोगल्ली फिरण्याची वेळ आली नसती जनतेने तुम्हाला भरभरून दिले पण तुम्हाला त्याची परतफेड करता आले नाही-इमरान जागीरदार

३५ वर्षात विकास केले असता तर आज गल्लोगल्ली फिरण्याची वेळ आली नसती जनतेने तुम्हाला भरभरून दिले पण तुम्हाला त्याची परतफेड करता आले नाही-इमरान जागीरदार
बीड/वार्ताहर
बीड च्या जनतेने दोन्ही क्षीरसागरांना सत्ता दिली ३५ वर्ष ज्यांनी पालिकेवर एकहाती सत्ता गाजवली त्यांनी शहराचा बट्टयाबोळ केला ना रस्ते निट, ना गटारी नीट, वेळेवर पाणी ही येत नाही, अर्धा शहर अंधारात, मोठे उद्यान ही नाही, शहरात वाहनांना पार्किंगसाठी कोणतीच जागा नाही, बेशिस्त पार्किंगमुळे शहरात वाहनधारकांना मोठे अडचण येत आहे कोणतीच बहुतीक सुविधा या क्षीरसागरांनी बीडकरांना दिली नाही. ३५ वर्ष सत्ता भोगली विकास कामे करता आले नाही. विकास कामे केले असते तर आज गल्लोगल्ली फिरण्याची वेळ आली नसती किती ही फिरा किती ही फोडाफोडी करा कोणालाही प्रवेश द्या पण येणार्या नगरपालिकेच्या निवडणूकीत बीड ची सुजान जनता हे आमदार विनायकराव मेटे यांच्या शिसंग्राम सोबतच राहील आणि बीडच्या पालिकेवर शिवसंग्रामचाच झेंडा फडकेल असे पत्रक शिवसंग्रामचे युवा नेते इमरान जागीरदार यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, या क्षीरसागर परिवारानी बीड शहराचा वाटोळाच केला आहे. कोणतेच विकासकामे केले नसून फक्त दिखावाच करण्यात जास्त वेळ घालविला आहे. बीड शहरात आज रस्ते नाही, गटारी नाही, नळाला वेळेवर पाणी येत नाही, पथदिवे नाही, लहान मुलांना खेळण्यासाठी चांगले दर्जाचे उद्यान नाही कोणतेच बहुतीक सुविधा या क्षीरसागरांनी या शहराला दिले नाही. बीडच्या जनतेने या परिवाराला भरभरून सत्ता दिली पण या क्षीरसागरांनी बीड शहराचा वाटोळाच केला आहे आता पुन्हा नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी हे परिवार गल्लोगल्ली फिरतांना दिसत आहे. 35 वर्षात विकास केले असते तर आज गल्लोगल्ली फिरण्याची वेळ आली नसती किती ही फिरा किती ही कार्यकर्ते जमा करा पण येणार्या निवडणूकीत बीडची सुजान जनता हे शिवसंग्राम सोबतच राहील अन पालिकेवर शिवसंग्रामचाच झेंडा फडकेल असा विश्वास शिवसंग्रामचे युवा नेते इमरान जागीरदार यांनी केले आहे.








