कर्मवीर कै.रणजितसिंह चौव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य व रक्तदान शिबीर

कर्मवीर कै.रणजितसिंह चौव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य व रक्तदान शिबीर
जास्तीत जास्त नागरिकांनी शिबीराचा लाभ घ्यावा-राणा रणजितसिंह चौव्हाण
बीड/रिपोर्टर
बीड न.प.चे माजी नगराध्यक्ष कर्मवीर कै.रणजितसिंह (भाऊ) झुंबरसिंह चौव्हाण यांच्या 67 व्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य शिबीराचा रूग्णांनी लाभ घ्यावा. रक्तदान करण्यासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन राणा चौव्हाण यांनी केले आहे.
1 ऑगस्ट रोजी माजी नगराध्यक्ष रणजितसिंह चौव्हाण यांची जयंती आहे. यानिमित्ताने मोफत आरोग्य व रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत आरोग्य शिबीर होणार आहे. सदरील हे शिबीर जुना मोंढा रोड बीड येथील बालाजी मंदिर याठिकाणी होणार आहे. आरोग्य शिबीरामध्ये मधुमेह, र्हदयविकार, गुडघेदुखी, नेत्रतपासणी, काचबिंदु शस्त्रक्रिया, मोतिबिंदु, लासरू, रक्तदाब, सर्पदंश, सांधेदुखी, अर्धांगवायु, मणक्याचे विकार, हाडाच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, विषबाधा व इतर काचोळ्याच्या शत्रक्रिया, कंबरदुखी, सर्व त्वचारोग, केसविकार, दंतरोग तपासणी करण्यात येणार आहे. या शिबीरात डॉ.अमित काळे, डॉ.विशाल हजारी, डॉ.प्रदिप सानप, डॉ.अजित काळे, डॉ.अमित बायस, डॉ.सुषमा खोसे, डॉ.धनराज वाघमारे, डॉ.आनंद काळे हे डॉक्टर शिबीरामध्ये सेवा देणार आहेत. संबंधीतांनी नोंदणीसाठी कृष्णा मेडिकल हिरालाल चौक, मो.9130136136, गजानन मंगल सेवा केंद्र शनिवार पेठ मो.9420411855, राणा चौव्हाण मो.9422242750, जय हार्डवेअर मो.9028902814 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदरील शिबीराचे आयोजन कर्मवीर कै.रणजितसिंह (भाऊ) झुंबरसिंह चौव्हाण सामाजिक प्रतिष्ठाण, हिरालाल चौक व्यापारी संघटना, महाराणा प्रताप गणेश मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान आरोग्य शिबीरासोबतच रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन राणा रणजितसिंह चौव्हाण यांनी केले आहे.








