प्रभाग क्रं.२१ मधील मंजूर रस्त्याचे कामे मार्गी लावा - हाफिज अशफाक

प्रभाग क्रं.२१ मधील मंजूर रस्त्याचे कामे मार्गी लावा - हाफिज अशफाक
नसता तीव्र रास्ता रोको चा इशारा
बीड/वार्ताहर
जुने प्रभाग क्रमांक एकवीस आणि नवीन प्रभाग क्रमांक 22 23 ,आणि 24 मधील काही भागातील मंजूर असून देखील रस्त्याची कामे करण्यास नगरपालिका प्रशासन हे वारंवार टाळाटाळ करत आहे,हा दूजाभाव गेल्या पाच वर्षांपासून आमच्या सोबत सुरू आहे याचे कारण काय तर आम्ही एम आय एम पक्षाकडून निवडून आलेलो आहोत आणि आमच्या कार्यकाळात येथील कामे मार्गी लागली तर याचे श्रेय आम्हाला मिळेल म्हणून या खुन्नस भावनेतून येथील कामे करायची नाही ,हा दूजाभाव का..? वाटले तर श्रेय तुम्हालाच घ्या परंतु आता लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका ,आम्ही या पूर्वी ही वारंवार निवेदन ,आंदोलन करून आता थकलोय लोकांना ही खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे ,सध्या पावसाळा सुरू आहे ,साथ रोगांची हैदोस माजवलां आहे ,दवाखान्यात जाण्यासाठी या भागात रिक्षा सुद्धा येत नाही,शहरातील अन्य भागात चांगले रस्ते करायचे आणि साध्या मुरूम साठी आमच्या लोकांना वेठीस धरणे ही गोष्ट चुकीची आहे या पूर्वी ही आम्ही निवेदन दिले आंदोलन केले त्या नंतर लेखी आश्वासन देत एक दोन रोड आपण केलेत ,आता जे मंजूर आहेत तेवढे ही करून टाका ना कशाला सर्वसामान्य लोकांना वेठीस धरता,निवेदन तर आम्ही दिलेच आहे परंतु त्यावर ही आपण काम करण्यास तयार नसाल तर आता आमच्या ही सहनशीलतेचा अंत झाला आहे ,त्यावर लवकरच तोडगा न निघाल्यास तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात यावी याची सुद्धा दखल ही प्रशासनाने घ्यावी अशी मागणी एम आय एम चे नेते तथा नगरसेविका पुत्र हाफिज अशफाक अय्यूब पठान मुफ्ती वाजेद यांनी जीलहाघीकारी न. प.चे प्रशासक आणि मुख्याधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे








