प्रभाग क्र. ११ अमराई, बालेपीर मधील मंजूर रस्ता पूर्ण बनून समस्या सोडवण्यात याव्या-सय्यद आखेब

Beed

प्रभाग क्र. ११ अमराई, बालेपीर मधील मंजूर रस्ता पूर्ण बनून समस्या सोडवण्यात याव्या-सय्यद आखेब

विभागीयआयुक्त,जिल्हाधिकारी, न.प मुख्याधिकारी,सा.बां विभाग यांना देण्यात आले निवेदन

बीड/वार्ताहर 

प्रभाग क्र. 11 अमराई, बालेपीर मधील रस्ता अतिशय खराब झालेला होता.कित्येक वर्षांपासून वार्डातील रहिवासी रस्ता बनविण्याची मागणी करीत होते.रहिवाश्यांच्या सततच्या मागणी व केलेल्या पाठपुराव्याने सदरील रस्त्याचे काम सुरू झाले,नगरपरिषदासाठी वैशिष्ठपूर्ण योजनेंतर्गत प्रभाग क्र.११ मधील सदरील अमराई गल्ली रस्त्याच्या कामासाठी ४९९५६१० अंदाजित रक्कम मंजुर झाल्याचे दि:-१३.०१.२०२१ जिल्हाधिकारी यांच्या सहीचे पत्र निघालेले आहे.अमराई गल्लीचे पूर्ण रस्त्याचे काम मंजूर असल्याचे पत्रामध्ये नमूद असताना प्रत्यक्षात सदरील गल्लीचे रस्त्याचे व नाल्याचे काम हे अर्ध्या रस्त्याचेच करण्यात आले आहे. संपूर्ण गल्लीचे काम करण्यात आले नसल्यामुळे प्रभागातील नागरिकांना चिक्खल,मोठं मोठे खड्यातुन चालावे लागत आहे.पावसाळ्यात दुचाकीवरून पडल्याने यामध्ये रोज अपघात घडत आहेत.महिला,वृद्ध नागरिक यांना या रस्त्यावरून चालताही येत नाही.याची दखल घेण्यास कोणी तय्यार नाही.मा. विभागीय आयुक्त,मा.जिल्हाधिकारी,न.प.मुख्याधिकारी,कार्यकारी अभियंता.सा.बां.विभाग यांना ही सदरील रस्त्याच्या प्रश्नांविषयी दि:-28/07/2022 रोजी निवेदन देण्यात आलेले आहेत परंतु कारवाई काहीच झालेली नाही. सदरील मंजूर रस्त्याचे काम आर्धेच न करता अमराई गल्लीतील संपूर्ण रस्त्याचे व नाल्याचे काम पूर्ण करून रस्त्याच्या व नालीच्या असलेल्या समस्या सोडविण्यात याव्यात ही मागणी सय्यद आखेब यांनी प्रभागातील नागरिकांच्या वतीने करीत केली आहे.

Sharing

Visitor Counter