घरोघरी तिरंगा उपक्रम –दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरावयाची आवश्यकता नाही

Beed

घरोघरी तिरंगा उपक्रम –दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरावयाची आवश्यकता नाही

बीड/वार्ताहर 

घरोघरी तिरंगा मोहिमेंतर्गत घरोघरी तिरंगा फडकवताना दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 हे तीन दिवस दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरावयाची आवश्यकता नाही, कार्यालयांना याबाबत ध्वजसंहितेचे पालन करावे लागेल, असे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे पत्र दि. 21 जुलै रोजी प्राप्त झाले आहे व तशा सूचना तालुका स्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यलढ्याच्या देदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतींवर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करायची आहे.

Sharing

Visitor Counter