नॅशनल उर्दू विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रंग भरण स्पर्धा उत्साहात

Beed

नॅशनल उर्दू विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रंग भरण स्पर्धा उत्साहात

बीड/प्रतिनिधी

शहरातील जुना बाजार भागात असलेल्या नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने रंग भरण स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभाग नोंदविला. या रंगभरण स्पर्धेमध्ये अ गटात इयत्ता पाचवी व सहावी आणि ब गटात इयत्ता सातवी व आठवी तील एकूण ११५ स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये रंगभरण स्पर्धेच्या आनंदासह आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होत आहेत हे जेव्हा या छोट्या-छोट्या विद्यार्थ्यी स्पर्धकांना गुरुजनांनी सांगितले तेव्हा त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठीचे आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले तसेच आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचे महत्व ही विशद करण्यात आले. यावेळी प्राचार्य सिद्दिकी नवीद यांनी सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ही रंगभरण स्पर्धा यशस्वी करण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Sharing

Visitor Counter