मिलीया महाविद्यालयात विद्यार्थींना संरक्षण मार्गदर्शन संपन्न 

Beed

मिलीया महाविद्यालयात विद्यार्थींना संरक्षण मार्गदर्शन संपन्न 

बीड/प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त मिलिया मुलींची माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे अपराध , काळजी व संरक्षण तसेच बालकासंबंधी होणारे अत्याचार याबाबत मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले . तसेच सध्याच्या काळात प्रत्येकाच्या जिवनावश्यक झालेला मोबाईल वापराबाबत विद्यार्थीनींना तसेच शहरातील महाविद्यालय , शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले . सदरील मार्गदर्शन जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर , अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार , डीवायएसपी संतोष वाळके , शहर पोलीस ठाण्याचे पी . आय रवि सानप , सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी मार्गदर्शन केले . यावेळी महाविद्यालयातील कर्मचारी , यांच्यासह महिला पोलीस हवालदार मिरा रोडेकर , एएसआय चव्हाण , पो.कॉ.अशपाक सय्यद यांची उपस्थिती होती .

Sharing

Visitor Counter