शिंदेशाहीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार महिलाविना-स्वाती मोराळे

शिंदेशाहीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार महिलाविना-स्वाती मोराळे
बीड/वार्ताहर
चाळीसाव्या दिवशी चाळीस आमदार फुटून तयार झालेल्या शिंदेशाही मंत्रिमंडळाचा अखेर आज विस्तार झाला परंतु या विस्तारामध्ये एकही महिला आमदार दिसली नाही.पुजा राठोड मृत्यू प्रकारणी राजीनामा द्यावा लागलेल्या ना. संजय राठोड यांनी आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली यामुळे मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी मंत्रिमंडळ विस्तार होण्या अगोदर त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. दोन मुले व दोन मुली टीईटी परीक्षा घोटाळ्यात अडकले असताना पिता अब्दुल सत्तार यांनाही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले आहे.
राणे, राणा, चित्रा वाघ यांची बक्षीसी यावेळी देण्याचे पक्षाने टाळले आहे. पुढचा मुख्यमंत्री प्रहार पक्षाचा असेल म्हणणाऱ्या बच्चू कडु यांनाही सध्यातरी मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. भाजपा अथवा शिंदेगट यांना आपला पाठिंबा देणाऱ्या एकाही अपक्ष आमदाराला दोन्ही गटाने मंत्रिमंडळात घेणे टाळले आहे. महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न राबवला जाईल असा अंदाज वर्तवला जात होता परंतु तो टाळून भाजपाने आपल्या जुन्या मंत्र्यांना पुन्हा संधी दिली आहे. फुटून आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना मात्र मंत्रिपद देऊन त्यांचा सन्मान राखला गेला आहे.
शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची स्वप्ने दाखवली होती त्यांचा ब्रम्ह निराश झाला असला तरी दिपवाळी अगोदर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. काहींना मंडळे तर उरलेलेना भरीव निधी देण्याचा फॉर्मुला ठरला आहे.तानाजी सावंत यांना स्नेह भोजनाचा फायदा झाला असला तरी संतोष बांगर, संजय शिरसाठ यांना मात्र गॅसवर ठेवण्यात आले आहे. आत्ता आणखी एक विस्तार होईल त्यावेळी तरी इच्छुकांची वर्णी लागेल अपक्ष, आयाराम गयाराम, महिला यांची वर्णी लागेल.








