एआयएमआयएम पक्षाच्या जिल्हा निरीक्षकांची निवड ! 

Beed

एआयएमआयएम पक्षाच्या जिल्हा निरीक्षकांची निवड ! 

ॲड. शेख शफीक, हाजी इसाक, हाजी इरशाद, मोहम्मद माजेद यांची निरीक्षकपदी निवड

बीड/प्रतिनिधी

नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीसाठी एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांची बीड जिल्ह्यासह अमरावती जिल्ह्याच्या निरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

तसेच बीड जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून शफिक भाऊंसह औरंगाबाद महानगरपालिकेतील हाजी इसाक व हाजी इर्शाद या दोन्ही नगरसेवकांनाही बीड जिल्हा निरीक्षकपदी निवडण्यात आले आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून शफिक भाऊंसह जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद माजेद बिल्डर यांचीही निवड करण्यात आली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे एआयएमआयएम पक्षातर्फे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

एआयएमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार बॅरिस्टर अल्हाज असदुद्दीन ओवैसी यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील, राज्य कार्याध्यक्ष डॉक्टर अब्दुल ग़फ़्फ़ार कादरी, मराठवाडा प्रभागाध्यक्ष फिरोज लाला यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. शेख शफिक भाऊ यांची बीड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यापासून आजपर्यंत ते झोकून देऊन अहोरात्र जनसेवेत करत असलेले कार्य तसेच पक्षीय पातळीवर सातत्याने करत असलेले उल्लेखनीय कार्य बघता त्यांच्या खांद्यावर आता बीड जिल्हाध्यक्ष पदासह नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीसाठी बीड व अमरावती जिल्हा निरीक्षकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या सह हाजी इसाक व हाजी इर्शाद या औरंगाबाद महानगरपालिकेतील दोन्ही नगरसेवकांची बीड जिल्हा निरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे. या शिवाय शफिक भाऊंसह जालना जिल्हाध्यक्ष मोहम्मद माजेद बिल्डर यांची अमरावती जिल्हा निरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे. 

या सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे बीड जिल्हा एआयएमआयएम सह अमरावती आणि राज्यातील इतर जिल्ह्यातूनही स्वागत करण्यात आले आहे. याबद्दल बोलताना शफिक भाऊ म्हणाले की, आतापर्यंत जसे जिल्हाध्यक्ष पदाचे कार्य इमाने इतबारे करीत आहे, ज्यात आपल्या सर्वांचे सहकार्य नेहमी लाभते असेच बीड आणि अमरावती या दोन्ही जिल्ह्याच्या निरीक्षक पदाचे कार्य ही सर्वांना सोबत घेऊन करू तसेच यापुढेही आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असे म्हटले. यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter