पंचशिलाच्या पालनातच विश्वाची शांती आहे.- विपस्सनाचार्य भिक्खु सरणंकर थेरो,नागपुर

Beed

पंचशिलाच्या पालनातच विश्वाची शांती आहे.- विपस्सनाचार्य भिक्खु सरणंकर थेरो,नागपुर

प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था बीड द्वारा अयोजीत तिन दिवशीय बौद्ध धम्मसंस्कार शिबीराचा सांगता समारोह मोठ्या हर्ष उल्हासात संपन्न .

बीड/वार्ताहर 

प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था बीडच्या वतीने विपस्सनाचार्य भिक्खु सरणंकर थेरो नागपुर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 ,8,व 9 अॉगष्ट रोजी बौद्ध धम्मसंस्कार शिबीराचे अयोजन भिक्खु धम्मशील यांनी केले होते.सदर शिबीरात एक दिवशीय ध्यान साधना शिबीर,एक दिवशीय धम्म कार्यशाळा व एक दिवशीय मुलां-मुलींचे धम्म संस्कार व ध्यान साधना शिबीराचे अयोजन करण्यात आले होते.या शिबीरात बीड शहर व परीसरातुन शेकडो विद्यार्थी व उपासक-उपासिका ,साधक-साधीका वर्गांनी सहभाग नोंदवला व धम्मदेसनेने लाभान्वित झाले.जगातील व देशातील सध्यस्थिती पाहाता संपुर्ण जगाला खऱ्या अर्थाने बुद्ध तत्वज्ञानाची गरच आहे.आज लोक भयभित जिवन जगत असुन.स्वतःला असुरक्षित समजत आहे.लहान तरुण मुले मुली हे व्यसनाधीन होत असुन आधुनिक तंञज्ञानाचा मुले गैरवापर करीत आहेत.त्यामुळे तरुण वर्गाचे भवितव्य धोक्यात असुन अशा परिस्थितीत फक्त महापुरुष व तथागत बुद्धांचे विचारच जगाला तारु शकतात असे विचार विपस्सनाचार्य भिक्खु सरणंकर थेरो नागपुर यांनी सदर शिबीरात मांडले.पंचशील हाच सुखी जिवन जगण्याचा मार्ग असुन.प्रत्येकाणे याचे पालन केले पाहिजे.वाईट कर्मापासुन सदैव सावध राहिले पाहीजे.आणि कुशल कर्म,पुण्य कर्म सातत्याने करत राहीले पाहिजे .प्रत्येक व्यक्तीने तो कुठल्याही जाती धर्माचा असला तरी त्याने माणुस म्हणुन आपल्या चित्ताला शुध्द करण्यासाठी नेहमी ध्यानसाधनेचा अभ्यास केला पाहिजे.व आपल्या मनातील वाईट विकार व विचाराला नष्ट करुन पवीञ मनाने जिवन जगत आपले मनुष्य जिवन सार्थकी लावले पाहिजे असेही भंतेजी म्हणाले.

शिबीराच्या यशस्वीतेसाठी प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्थेचे सर्व सदस्य व शिवणी येथील ग्रामस्थांनी परीश्रम घेतले.

Sharing

Visitor Counter