पारगाव घुमरामध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा

पारगाव घुमरामध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा
गेली अनेक वर्षे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण ज्या दिवशी या समाजातील निरक्षरता संपून आदिवासींची मुले शिक्षण,रोजगार,आरोग्य व उद्योगधंद्याच्या मुख्य प्रवाहात सामील होतील, तो दिवस खऱ्या अर्थाने "जागतिक आदिवासी दिन” असेल - मा.सरपंच तात्यासाहेब गांगुर्डे
पाटोदा/वार्ताहर
आदिवासी या शब्दाला हजारो वर्षाचा इतिहास असून जंगल, डोंगरदऱ्यात राहणारा, बाहेरच्या जगाशी संपर्क नसणारा,अशी त्याची ओळख आहे.लोककला, वारली चित्रकला, पारंपरिक तारपा नृत्य आणि शिल्पकला या त्यांच्याच कलांमधून आदिवासी समाजाला प्रगतीची कवाडे उघडली गेली.हा समाज निसर्गातील प्रत्येक वस्तुला आपले दैवत मानतो आणि निसर्गावर भरभरून प्रेम करतो पारगाव येतील आदिवासी दिना निमित्त कार्यक्रमा प्रसंगी बोलताना Api पवारसाहेब म्हटले असून ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याचा भारत सरकारने निर्णय घेतला. असून दरवर्षी हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यतो ह्या वर्षी पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा यते जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास पाटोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार साहेब,पारगाव घुमराचे सरपंच पद्माकर घुमरे, धनगर समाज उपतालुकाध्यक्ष शाम गाडेकर,पारगावचे माजी सरपंच तात्यासाहेब गांगुर्डे,सुभाष गांगुर्डे, अक्षय गांगुर्डे यांच्यासह भील वस्तीवरील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते








