छत्तीसगढ़ येथे "आधुनिक भारतीय रंगमंच के शिल्पकार: संगीतसूर्य केशवराव भोसले" पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

छत्तीसगढ़ येथे "आधुनिक भारतीय रंगमंच के शिल्पकार: संगीतसूर्य केशवराव भोसले" पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
वर्धा/वार्ताहर
दि.११: नाटककार, दिग्दर्शक आणि नाट्य समीक्षक डाँ. सतीश पावडे लिखित "आधुनिक भारतीय रंगमंच के शिल्पकार: संगीतसूर्य केशवराव भोसले" या हिंदी चरित्रग्रंथाचे प्रकाशन छत्तीसगढ़ येथे नुकतेच संपन्न झाले.
संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद, छत्तीसगढ़ प्रदेशच्या वतीने आयोजित 'संगीतसूर्य राष्ट्रीय जयंती समारोह' मधे या चरीत्र ग्रंथाचे प्रकाशन दुरदर्शन केंद्र छत्तीसगढ़चे सह संचालक, प्रसिद्ध लेखक डाँ. मनोज सोनोने यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध समाजसेवक तथा मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष रविन्द्र दाणी होते. डाँ. रश्मी भुरे, संगीत कलोपासक भगवंत जाधव, जयंत थोरात, समाज सेवक राकेश धोत्रे, प्रसिद्ध गायिका रागीणी कुटे, संगीतसूर्य के.भो.सां.प.च्या प्रदेशाध्यक्ष प्रतिक्षाताई बाबर,संगीतसूर्य संगीत कला केंद्राचे राष्ट्रीय समन्वयक प्रकाश लेनेकर,संयोजक गौरक्षनाथ पवल, केंद्राचे प्रबंधक राजेश केदार विचार पिठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
"संगीतसूर्य केशवराव भोसले फक्त महाराष्ट्राचे आणि फक्त संगीत रंगभूमीचे कलावंत नव्हते तर ते आधुनिक भारतीय रंगभूमीचे शिल्पकार होते. ते एक महान गायक, अभिनेता, नाट्य दिग्दर्शक , नाट्य प्रबंधक, संघटक आणि श्रेष्ठ रंगकर्मी होते.१८९५ ते १९२१ या कालात में रंगभूमीसाठी क्रांतिकारक कार्य केले परंतु त्यांची घोर उपेक्षाच करण्यात आली. की गई। अशा महान रंगकर्मी, कलासाधकाचे नाव कला-साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात पोचविण्याचे प्रभावी कार्य हे पुस्तक करेल", असे विचार या प्रसंगी डाँ. मनोज सोनोने यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे चरित्रकार, नाटककार, नाट्य दिग्दर्शक, नाट्य समीक्षक डाँ. सतीश पावडे यांनी आपल्या लेखकिय मनोगतात म्हटले की,, संगीतसूर्याचे चरित्र प्रत्येक कलाकार,गायक,रंगकर्मीने वाचण्याची,त्यांचा ऐतिहासिक संघर्ष समजून घेण्याची गरज आहे.हे चरित्र प्रेरणादायक आहे. आधुनिक भारतीय रंगभूमीचे शिल्पकार म्हणून संगीतसूर्य केशवरावांनी कसे नेत्रदीपक कार्य केले याची सविस्तर माहिती हा चरित्र ग्रंथ उपलब्ध करून देतो."
कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड तथा संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद, छत्तीसगढ़ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिक्षा बाबर यांनी स्वागत जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा दीशा धोत्रे, प्रा. शालिनी कदम, रागीणी कुटे यांनी केले. संचालन नीरजा भोसले यांनी तथा आभार प्रदर्शन वैशाली पवार यांनी केले.
या कार्यक्रमात सं.सू.के.भो.रा.सां.प. के राष्ट्रीय कार्याध्यक्ष नंदकुमार वानखेडे, विशाल इंगोले, लोकगायिका ममता शिंदे,नृत्यांगना नेहा गुप्ता, सीमा कापसे, मसेसचे कार्याध्यक्ष प्रकाश तथा भाऊसाहेब ठोकने आदि विशेष रूपाने उपस्थित होते.








