जिल्हा निरीक्षक अॅड. शेख शफिक भाऊ, हाजी इसाक, हाजी इरशाद आढावा घेणार !

एआयएमआयएम पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांनी १२ ऑगस्ट च्या आढावा बैठकीस उपस्थित रहावे - शेख एजाज (खन्ना भैय्या), शिवाजीराव भोसकर
जिल्हा निरीक्षक अॅड. शेख शफिक भाऊ, हाजी इसाक, हाजी इरशाद आढावा घेणार !
बीड/प्रतिनिधी
जिल्हा परिषद, नगर परिषद पंचायत समिती च्या निवडणूक पूर्वतयारीसाठी एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हा निरीक्षक ॲड. शेख शफीक भाऊ, हाजी इसाक, हाजी इर्शाद यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. याकरिता बीड शहरातील बशीरगंज भागात असलेल्या पक्षाच्या मुख्य कार्यालयात सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी शुक्रवार दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ०१:०० वाजता आवश्यक माहिती व सर्व कागदपत्रांसह उपस्थित रहावे. असे आवाहन पक्षाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष शेख एजाज (खन्ना भैय्या), शहराध्यक्ष शिवाजीराव भोसकर यांनी केले आहे.
जिल्हा परिषद, नगर परिषद पंचायत समिती या तिन्ही ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येने निवडून आणण्याकरिता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार अल्हाज बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील, कार्याध्यक्ष डॉक्टर अब्दुल गफ्फार कादरी, मराठवाडा प्रभागाध्यक्ष फिरोज लाला, सरचिटणीस सय्यद मोईन यांच्या मार्गदर्शनानुसार आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरिता बीड शहरातील बशीरगंज भागात असलेल्या पक्षाच्या मुख्य कार्यालयात बीड जिल्हा निरीक्षक अॅड. शेख शफिक भाऊ, हाजी इसाक, हाजी इरशाद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाभरातील प्रत्येक तालुक्याचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आतापर्यंत आपापल्या प्रभागात केलेल्या कार्याची माहिती, जनहितास्तव करणे आवश्यक असलेल्या परंतु करण्यात अडचणी येत असलेल्या बाबी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह पक्ष निरीक्षकांसमोर मांडाव्यात. समस्या दूर करण्याकरिता आवश्यक असलेली कामे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पक्षीय पातळीवर दखल घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याकरिता शुक्रवार दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता घेण्यात येणाऱ्या अति आवश्यक आढावा बैठकीत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी न चुकता उपस्थित राहावे. असे आवाहन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बीड तालुकाध्यक्ष शेख एजाज खन्ना भैय्या, शहराध्यक्ष शिवाजीराव भोसकर यांनी दिलेल्या पत्रकातून केले आहे.








