आपल्या कौशल्य,तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोग युवकांनी विकासासाठी करावा - राहुल मोरे

आपल्या कौशल्य,तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोग युवकांनी विकासासाठी करावा - राहुल मोरे
बीड/प्रतिनिधी
आजचा युवा ज्ञान आणि विज्ञानाच्या संस्कारातून घडत असून मानव व मानवी विकासाबाबतची योग्य जाण असणार आहे. समाज परिवर्तनाची ताकद युवकांमध्ये असून युवकांनी आपल्या ताकतीचा वापर सुयोग्य प्रकारे करून आपली,आपल्या राष्ट्राची उभारणीत त्यांच्या सकारात्मक शक्तीचा उपयोग करावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त राहुल मोरे यांनी केले आहे.
प्रत्येक देशाचे भवितव्य हे युवा पिढीच्या हाती असते,आजची तरुण पिढी ज्ञान,विज्ञान,तंत्रज्ञान, प्रयोगशील ,विश्वात वावरत असून युवकांचे विचारधारा ,मूल्य, प्रगती, प्रत्येक कृती ,घेतलेला निर्णय, युवकांचा प्रत्येक टाकले जाणारे पाऊल हे येणारे भविष्य घडवत असते,म्हणून मानवीय प्रगतीसाठी येणाऱ्या पिढीसाठी आजच्या युवकांसाठी योग्य,निर्भीड व हितकारक कार्य करण्याची गरज असून याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.
युवा पिढी ही देशाची शक्ती असते,त्यामुळे त्याचा उपयोग योग्य प्रकारे करून देशाची प्रगती साधने गरजेचे आहे. आजच्या युवकांनी आपल्या संरक्षणात्मक आणि संघटनात्मक कौशल्याच्या जोरावर देशाच्या विकासात्मक धोरणात आपली शक्ती लावावी. सोशल मीडियात न गुरफटता नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन जागतिक दर्जाच्या स्पर्धेत भाग घेणे आज आवश्यक बनले असून मानवी विकास साधने गरजेचे असून मानवाला समस्याला ज्या सामोरे आज जावे लागत आहे त्याचे निराकरण करणे गरजेचे आहे.तरुणांनी आपल्या कौशल्याने उद्योगशील व्हावे, तरुणांच्या क्षमतेला वाव देणे ही आज गरजेचे आहे.असे त्यांनी आवाहन केले आहे.








