मिलिया महाविद्यालयात "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" निमित्त जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र वाटप संपन्न

मिलिया महाविद्यालयात "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" निमित्त जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र वाटप संपन्न
बीड/वार्ताहर
दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" निमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड या कार्यालया तर्फे विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले, या मोहिमेचे माध्यमातून बीड येथील मिलिया महाविद्यालय येथे पात्र लाभार्थ्यांना प्राचार्य सत्तार सर,सय्यद आखेब ,शिक्षक मुजनैन सर,ज्येष्ठ नागरिक, कार्यालयीन कर्मचारी यांच्या हस्ते जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले, यानिमित्त जिल्हा जातपडताळणी समितीचे अध्यक्ष श्री.दिलीप जगदाळे, उपायुक्त श्रीम.एस.आर.मकरंद, संशोधन अधिकारी श्री. प्रदीप भोगले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातर्फे श्री. सय्यद आखेब रफीक यांनी मिलिया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना जात पडताळणीला आवश्यक कागदपत्र, अर्ज करण्याची पध्दत व अर्ज वेळेवर जमा करण्याच्या सुचना दिल्या. या कार्यक्रमासाठी प्राचार्य,शिक्षक,विध्यार्थी,जेष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.








