जि.प., न.प., पं.स. निवडणूका एआयएमआयएम पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढणार - शेख शफीक, हाजी इसाक, हाजी इरशाद 

Beed

जि.प., न.प., पं.स. निवडणूका एआयएमआयएम पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढणार - शेख शफीक, हाजी इसाक, हाजी इरशाद 

मुख्य कार्यालयातील आढावा बैठकीत शेकडोंच्या उपस्थितीने संचारले चैतन्य !

बीड/प्रतिनिधी

एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हा निरीक्षक ॲड. शेख शफीक भाऊ, हाजी इसाक, हाजी इर्शाद यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली शहरातील बशीरगंज भागात असलेल्या मुख्य कार्यालयात जिल्हाभरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक १२ ऑगस्ट, शुक्रवार रोजी दुपारी ०१:०० ते संध्याकाळी ०७:०० वाजेपर्यंत घेण्यात आली. या बैठकीत शेकडोंच्या संख्येत उपस्थितीने मोठे चैतन्य संचारले. या आढावा बैठकीत जिल्हा परिषद नगर परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याचे म्हटले.

 याविषयी सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यातील प्रत्येक तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पक्षाच्या मुख्य कार्यालयात घेण्यात आली. यासाठी शेख शफीक भाऊंसह औरंगाबाद महानगरपालिकेत नगरसेवक असलेले हाजी इसाक आणि हाजी इरशाद या तिन्ही पक्ष निरीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये उपस्थित जिल्हाभरातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्राचा आढावा व अडीअडचणी निरीक्षकांसमोर मांडल्या. सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मुलाखती मोठ्या उत्साहाने घेण्यात आल्या. तेवढ्याच उत्साहाने प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या कार्याचा अहवाल पक्षनिरीक्षकांसमोर मांडला. आतापर्यंत केलेली कामे व करणे आवश्यक असलेल्या कामांचा आढावा व येत असलेल्या अडीअडचणीही निरीक्षकांसमोर मांडण्यात आल्या. प्रत्येकाचे समाधान होईल अशाप्रकारे तिन्ही निरीक्षकांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर करण्याकरिता व सोडविण्याकरिता पक्ष सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे म्हटले. शिवाय जिल्हाभरातील एकूण एक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपसात मिळून मिसळून व एकदिलाने राहावे. जनतेसाठी आवश्यक असलेली कामे करण्याकरिता सतत पुढाकार घ्यावा. लक्षात घ्यावे की, गेल्या अनेक वर्षांपासून जनता सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे प्रत्येक पातळीवर बेजार झालेली आहे. जनतेला यातून बाहेर काढण्यासाठी होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी आपल्याला एआयएमआयएम पक्षाच्या रूपात एक सक्षम पर्याय द्यायचा आहे. आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार अल्हाज बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी सारखे उच्चशिक्षित नेतृत्व देशाच्या जनतेसाठी अहोरात्र झटत आहेत काम करीत आहेत. शिवाय आपल्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज़ जलील सुद्धा उच्चशिक्षित आणि जनतेची तळमळ नखशिखात सामावलेले नेतृत्व आहे. हे दोन्ही वाघ देशाच्या संसदेमध्ये तळागाळातल्या भारतीय जनतेसाठी नेहमी आवाज बुलंद करीत आहेत. आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष  संसदेमध्ये आवाज बुलंद करत आहेत. तर राज्य कार्याध्यक्ष डॉक्टर अब्दुल गफ्फार कादरी, राज्य सरचिटणीस सय्यद मोईन, मराठवाडा प्रभागाध्यक्ष फिरोज लाला हेही जनतेच्या अडीअडचणीसाठी पायाला भिंगरी बांधल्यागत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काळात आहेत. तशाच प्रकारे आपल्या पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपापल्या कार्यक्षेत्रात सर्वसामान्य तळागाळातल्या जनतेसाठी आवाज बुलंद करून न्याय मिळवून देण्यासाठी सतत झटत राहावे. यामुळे जनतेची कामे तर होईलच शिवाय आपले संघटन व पक्षही मजबूत होईल गेल्या कित्येक वर्षापासून देशभरात सुरू असलेल्या राजकीय अनागोंदी कारभारामुळे देश रसातळाला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशी स्थिती यायला नको म्हणून जागरूक व सुजान जनता आपल्या पक्षाकडे मोठ्या आशेने पाहत आहे. जनतेची आशा व अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. हे लक्षात घेऊन एकूण एक पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे आणि जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुका आपल्याला पूर्ण ताकदीनिशी लढायच्या आहेत असे म्हटले.

यावेळी बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष शेख एजाज़ खन्ना भैय्या, युवक जिल्हाध्यक्ष शेख मतीन, शहराध्यक्ष शिवाजी भोसकर, नगरसेवक अजहर मोमीन, कर्मचारी अधिकारी जिल्हा अध्यक्ष शेख वजीर सर, शहर उपाध्यक्ष शेख शाकेर, युवक शहराध्यक्ष शेख सलमान, जिल्हा सरचिटणीस समी भाई जेके, जिल्हा सहसचिव अन्वर पाशा, तालुका उपाध्यक्ष साजन चौधरी, जिल्हा सहप्रवक्ता शेख बिलाल, वाहन मालक चालक जिल्हाध्यक्ष फारुख खान, युवक शहर सचिव शाहेद कवडगावकर, जावेद खान, बांधकाम अध्यक्ष सय्यद बासेद, सोशल मीडिया अध्यक्ष सोहेल शिकलकर, आरोग्य सेल सोहेल मोमीन, वार्ड अध्यक्ष बाबर भाई, फैय्याज खान, फेरोज मनियार,आवेज मनियार, गेवराई तालुका प्रवक्ता शेख युनुस, तालुक युवकाध्यक्ष हाफेज नवीद साहेब, तालुका सचिव लियाकत बेग, युवक शहराध्यक्ष शेख फेरोज, तालुका उपाध्यक्ष साहील शेख, सचिव शाकेर भाई, मालापुरी अध्यक्ष शेख सलाम, उपाध्यक्ष जाबेर भाई, नेकनुर शहराध्यक्ष तौफीक पहेलवान, जिल्हा परिषद  प्रमुख अन्वर हाश्मी, सायगाव अध्यक्ष शेख रईस, सिरसाला अध्यक्ष जुम्मन पठाण, वडवणी आमेर भाई, एजाज भाई कवडगावकर, धारुर शहराध्यक्ष शेख मोबीन, प्रभारी सिद्दीक भैय्या, आष्टी तालुकाध्यक्ष अस्लम अत्तार, जीशान सय्यद, आयाज कुरेशी, अजीम खान, अमोल वाल्हेकर, अंबेजोगाईहून जिल्हा प्रवक्ता रमीज सर, युवक तालुकाध्यक्ष समीर शेख, युवक शहराध्यक्ष सत्तार तांबोली, फहीम शेख, हारुन शेख, परवेज खान, मसुद रजा, सलीम गौवली, इस्माइल गौवली, परली  शेख शरीफ भाई तालुका अध्यक्ष अकबर भाई कच्छी, शहराध्यक्ष शेख आबिद भाई, युवा तालुकाध्यक्ष शेख अनवर, युवा शहर अध्यक्ष फिरोज भाई कार्याध्यक्ष तौफीक भाई, शहर उपाध्यक्ष उमर भाई, युवा शहर उपाध्यक्ष

ताजू भाई, मुस्तफा भाई, मोहसीन भाई, माजलगावहून जिल्हा उपाध्यक्ष शेख युसुफ, इद्रिस शेख (तालूकाध्यक्ष), शेख रशिद शहराध्यक्ष, युसुफ शेख, हाफेज मोहसीन तालुका सचिव, गुड्डू खतिब शहर संघटक, नावेद सिद्दिकी युवा नेते, हाफेज फारुख तालुका प्रवक्ता, हाफेज फारुख, शमशेर पठाण युवक  तालुकाध्यक्ष, अन्सर शेख, उप तालुकाध्यक्ष, मजहर शेख आदींसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

 

निरीक्षकांनी घेतल्या मान्यवर नागरिकांच्याही मुलाखती

पक्षीय पातळीवर संघटन मजबूत करून जनहिताचे कार्य करण्यास प्राधान्य देणाऱ्या एआयएमआयएम पक्षाच्या तिन्ही निरीक्षकांनी शहरातील काही मान्यवर नागरिकांना भेटून त्यांचीही मते जाणून घेतली. समाजात पत असलेले शिक्षित, उच्चशिक्षित नागरिकांच्या निरीक्षकांनी खास भेटी घेऊन पक्षाबाबत, पदाधिकाऱ्यांबाबत विचारणा केली. त्यांच्या पक्षाकडून पदाधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा आहेत याबद्दलही बोलते केले. याला मान्यवरांनीही मोकळ्या मनाने प्रतिसाद दिला व एआयएमआयएम पक्षाकडून असलेल्या अपेक्षा तसेच सध्या सुरू असलेल्या हुकूमशाही प्रणित लोकशाही मधून वाट काढत लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी जनतेला एआयएमआयएम कडून मोठ्या अपेक्षा आहेत. असेही अनेकांनी बोलून दाखविले. यावर निरीक्षकांनी म्हटले की, एआयएमआयएम पक्ष जनतेला नाराज करणार नाही. जनतेसाठी अहोरात्र झटत राहणार यात दुमत नाही.

 

एआयएमआयएम पक्ष सर्वांसाठी - शफिक भाऊ 

आपल्या पक्षाला काही पक्ष कुत्सितपणे फक्त मुस्लिमांचा पक्ष म्हणून अपप्रचार करतात परंतु हे खरे नाही. एआयएमआयएम पक्ष फक्त मुस्लीमांसाठी नसून पक्षाचा दृष्टिकोन पक्षाचे कार्य हे सर्व समावेशक आहे. प्रत्येक जाती धर्मातील नागरिकांसाठी आहे. हे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह पक्षाचे राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांसह देशपातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या कार्याकडे पाहिल्यास सहज लक्षात येईल. आपल्या पक्षाला कोणत्याही जाती धर्माचे वावडे नाही. आपला पक्ष सर्व जाती-धर्माच्या नागरिकांसाठी आहे. आपल्या सार्वभौम भारत देशात आपला पक्ष ही सार्वभौम आहे.

 

Sharing

Visitor Counter