मा.आ.विनायकरावजी मेटे यांचा घात की अपघात?

मा.आ.विनायकरावजी मेटे यांचा घात की अपघात?
बीड/वार्ताहर
माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे आज पहाटे पाचच्या सुमारास खोपोली येथील बोगद्याजवळ अपघाताची घटना घडली . अपघातानंतर जखमी मेटे यांना एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . मात्र मदत वेळेवर न पोहोचल्याने त्यांचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली.रात्रंदिवस लोकांच्या मदतीस धावून येणारा नेता शिवसंग्रामचे संस्थापक, माजी आमदार, मराठा आरक्षण आंदोलनाचे बिनीचे नेते, खऱ्या अर्थाने प्रस्थापित व्यवस्थेला धक्का देणारे व्यक्तीमत्व असलेले विनायक मेटे हे स्वत:च एक पर्व होतं. हे पर्व असं अचानक संपेल असं वाटलं नव्हतं. त्यांच्या जाण्याने केवळ आंदोलनाचेच नव्हे तर बीड जिल्हयाचेही मोठे नुकसान झाले आहे. हे पचविणे जड आहे. महामार्गावर अपघात झाल्यानंतर एक तासभर कुठलीच मदत मिळत नाही हे आकलणाच्या पलिकडे आहे. समाजाला कायम कोणत्यातरी उत्सवात अडकविणाऱ्या शासन आणि प्रशासनाची ही मदत का मिळाली नाही याची चौकशी करण्याची गरज दिसत आहे.बीड जिल्ह्याचे नेत्यांचा अपघातच का होत असावा? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.या अपघाताबद्दल नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात असुन याबद्दल अधीक माहीती समोर काय येत आहे हे पाहणे गरजेचे आहे.








