‘व्हाइस ऑफ मीडिया’च्या बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी दिनेश लिंबेकर, संतोष कानडे यांची निवड

‘व्हाइस ऑफ मीडिया’च्या बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी दिनेश लिंबेकर, संतोष कानडे यांची निवड
- इतर जिल्हा कार्यकारिणीही जाहीर
बीड/प्रतिनिधी
दि.12 : पत्रकाराच्या प्रश्नासाठी देशपातळीवर काम करणार्या व्हाईस ऑफ मीडियाच्या बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी दिनेश लिंबेकर, संतोष कानडे यांची निवड करण्यात आल्याची माहिती, संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
त्याचबरोबर संघटनेची इतर 20 जणांची कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली असून या कार्यकारिणीत सक्रीय असलेले अनेक नामवंत पत्रकारांना स्थान देण्यात आले आहे. संघटनेची कार्यकारिणी पुढील प्रमाणे. सरचिटणीस - प्रभात बुडूख, कार्यवाहक - उदय नागरगोजे, कार्यवाहक - केशव कदम, उपाध्यक्ष्यपदी - अमोल जाधव, भागवत जाधव, जालींदर धांडे, विनोद जिरे, प्रवक्ते - गणेश सावंत रांजणीकर, सह सरचिटणीस - सुनील यादव, कोषाध्यक्ष - अनंत वैद्य, संघटक - अनिल जाधव, संघटक - एजाज शेख, संघटक - अमोल मुळे, संघटक - ज्ञानेश्वर वायबसे, प्रसिध्दी प्रमुख - शुभम खाडे, सदस्य म्हणून - संजय तिपाले, शिरीष शिंदे, मुकेश झणझणे यांना स्थान देण्यात आले आहे. नवनियुक्त पदाधिकार्यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, कार्याध्यक्ष संजय आवटे, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया, जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.








