बीडमध्ये स्वातंत्र्यदिनी संस्कार भारतीकडून वंदे मातरमचे गायन

बीडमध्ये स्वातंत्र्यदिनी संस्कार भारतीकडून वंदे मातरमचे गायन
बीड/प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त संस्कार भारतीच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवसृष्टी येथे वंदे मातरमचे गायन करण्यात आले. पहिल्या स्वातंत्र्यदिनी पं.ओंकारनाथ ठाकुर यांनी सकाळी 6:30 वा. आकाशवाणीवर वंदे मातरम् हे गीत प्रथम गायले होते. त्याचे स्मरण म्हणून हा उपक्रम घेण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहणासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. बीडच्या संस्कार भारतीच्या वतीने आयोजित वंदे मातरम गायन कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी भारतामाता व पं. ओंकारनाथ ठाकुर यांच्या प्रतिमेचे पुजन देवगिरी प्रांताध्यक्ष भरत लोळगे,पूर्व महामंत्री कुलदिप धुमाळे,दिनदयाळचे गंगाधर देशमुख व जेथलीया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद वझे यांनी अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून संस्कार भारतीच्या वतीने देशातील 1400 समित्यांमध्ये सकाळी साडेसहा वाजता एकाच वेळी वंदेमातरमचे गायन करण्यात आल्याचे सांगितले. या उपक्रमात 75 जणांनी सहभागी होत गायन केले. सुत्र संचलन सुरेश साळुंके तर आभार प्रदर्शन गणेश तालखेडकर यांनी केले . यावेळी शहराध्यक्षा सौ स्नेहा पारगावकर,सचिव अनिल कुलकर्णी,वासुदेव निलंगेकर,गुरु कुलकर्णी,संतोष पारगावकर, लक्ष्मीकांत रुईकर,महेश देशमुख,अशोक कुलकर्णी, प्रा.राहुल पांडव, अनंत सुतनासे, अशोक गव्हाणे,मंजुषा कुलकर्णी, सुरभी खोपटीकर,रेणुका डांगे,मनिषा कुलकर्णी,सुनिता केंडे,सुरेखा औटी आदींनी परीक्षम घेतले.








