स्वरमीना फिल्म्स प्रस्तुत 'मिसिंग मिस्ट्री 'वेबसिरीजच्या गाण्याचे लॉंचिंग सम्पन्न

Beed

स्वरमीना फिल्म्स प्रस्तुत 'मिसिंग मिस्ट्री 'वेबसिरीजच्या गाण्याचे लॉंचिंग सम्पन्न

बीड/प्रतिनीधी 

स्वरमीना फिल्म्स प्रस्तुत, तुषार जाधव निर्मित आणि दिग्दर्शीत 'मिसिंग मिस्ट्री' या वेब सीरीज च्या 'हे मना ' हे गीत स्वरमीना युट्युब चॅनेलच्या माध्यमातून  सर्वत्र प्रदर्शित करण्याचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

    बीड येथील तरुण दिग्दर्शक तुषार जाधव यांच्या स्वरमीना फिल्म्सकृत 'मिसिंग मिस्ट्री ' या वेब सीरीज चे पहिले गाणे 'हे मना' हे काल स्वरमीना यु ट्यूब चॅनेल वरून रिलीज करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ गायक, रंगकर्मी भरतअण्णा लोळगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ऐश्वर्या डिजिटल चे प्रमुख व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बीड चे जिल्हाध्यक्ष किशोर कागदे हे होते. 'मिसिंग मिस्ट्री ' ही वेबसीरीज ही एक गुढ कथानक असलेली वेब सीरीज असून बीड आणि आजूबाजूच्या परिसरात चित्रित होत आहे. रिलीज करण्यात आलेले गाण्याच्या गीतकार गीतांजली कांबळे, गायिका तनिष्का गडगे, संगीत संयोजक शैलेंद्र निसरगंध यांचा तसेच ज्या कलाकारांवर हे गीत चित्रित झाले या सर्वांचा या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

   या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ऐश्वर्या डिजिटल चे प्रमुख तथा री.पा.ई. चे बीड जिल्हाध्यक्ष किशोर कागदे यांनी अशा प्रकारच्या उदयोनमुख निर्माते दिग्दर्शक यांना या क्षेत्रात पूढे जाण्यासाठी सर्वांनी मदत करण्याची गरज आहे असे म्हटले, अध्यक्ष म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना जेष्ठ संगीतकार व रंगकर्मी भरतअण्णा लोळगे यांनी देखील बीड ची सांस्कृतिक क्षेत्रात असलेल्या ओळखित तुषार जाधव निर्मित आणि दिग्दर्शीत या वेबसीरीज मुळे भर पडणार असून यामुळे बीडचे नाव निश्चितच प्रदेश स्तरावर गाजेल असे म्हटले. आपला निखारे, ओवी ते भैरवी आणि रिकामटेकडे या चित्रपट निर्मितीच्या कालखंडाचा उल्लेख करून सध्याची नवीन पिढी त्या पलीकडेही जाऊन वेगळे काही तरी करीत आहे याबद्दल त्यांनी 'मिसिंग मिस्ट्री ' च्या सर्व टीमचे अभिनंदन केले. या प्रसंगी लेखक अभिनेते एजाज अली,मिस महाराष्ट्र व मिसिंग मिस्ट्री मधील सहकलाकार प्रतिभा सांगळे, विकास सरवदे, ज्योती जावळे, अतुल ठोकळ, बाबासाहेब सोनवणे बालकलाकार सिद्धी टाक, अभिनेते संतोष वारे, नगर सेवक गणेश वाघमारे, दिगदर्शक प्रवीण वडमारे, सिने अभिनेते अशोक कांबळे प्रा. छाया सोंडगे, अतुल ठोकळ यांनी पण आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी 'हे मना ' गीतातील कलाकार अभिजीत जाधव व स्नेहल मुळे यांचा देखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक, नाट्यकलावंत ऍड. नितीन वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमास बीड शहरातील नाट्यप्रेमी व सिनेप्रेमी रसिकांची भरभरून उपस्थिती होती.

Sharing

Visitor Counter