स्वातंत्र्य दिनी बीडचे भुमिपुत्र अनिल संचेती यांचा पुण्यातील कार्यक्रमात सत्कार

Beed

स्वातंत्र्य दिनी बीडचे भुमिपुत्र अनिल संचेती यांचा पुण्यातील कार्यक्रमात सत्कार

बीड/प्रतिनिधी 

पुण्यातील पिंपळे निलख येथे सचिन साठे स्पेशल फडेशनच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सोमवार १५ ऑगस्ट २०२२ रोजी दहावी बारावीच्या परिक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात बीड जिल्ह्याचे भुमिपुत्र असलेले परंतु व्यवसायच्या निमित्ताने पिंपळे निलख येथे स्थाईक असलेले अनिल संचेती यांची नुकतीच भारतीय खाद्य निगम सदस्य महाराष्ट्र राज्य निवड झाल्याबद्दल कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर प्रविण तरडे, नितीन बानगुडे पाटील , सचिन साठे यांनी सत्कार केला.

 

Sharing

Visitor Counter