स्वातंत्र्य दिनाच्या आंदोलनात दिलेल्या आश्वासनाला मुख्याधिकारी उमेश ढाकणे जागले !

Beed

स्वातंत्र्य दिनाच्या आंदोलनात दिलेल्या आश्वासनाला मुख्याधिकारी उमेश ढाकणे जागले !

प्रभाग क्रमांक १२ मधील पाहणी दौऱ्यात पूल, पाच रस्ते व नाल्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन - शेख मोहसीन

बीड/प्रतिनिधी

अधिकारी कर्तव्यदक्ष असेल तर जनहिताची कामे कशी मार्गी लागू शकतात हे बीड नगर परिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी उमेश ढाकणे हे आपल्या कर्तव्यदक्ष कृतीतून दाखवून देत आहेत. याच रीतीने त्यांनी आपल्यातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची प्रचिती नुकतीच प्रभाग क्रमांक १२ मध्ये दाखवून दिली. बालेपीर एरियातील रोशनपुरा हा भाग येतो. या भागातील पाच रस्ते, पुल व नाल्यांचे काम गेल्या अनेक वर्षापासून बीड नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आजपर्यंत पडून आहे. याविषयी वारंवार निवेदने देऊन व आंदोलने करूनही विकास कामे सुरू होत नसल्याने माझ्यासह प्रभागातील अनेक नागरिक देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनादिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. यावेळी बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी स्वतः जातीने आंदोलन स्थळी आंदोलकांची भेट घेऊन त्यावेळी लिखित आश्वासन दिले होते की, प्रभाग क्रमांक 12 मधील रस्ते व नाल्यासंबंधी ज्या काही तक्रारी आहेत त्या पाहण्याकरिता लवकरच जातीने येऊन पाहणी करणार. त्यानंतर लवकरात लवकर काम सुरू करण्याचे प्रयत्न करू असे पाठीवर हात ठेवून म्हटले होते. या आश्वासनाला मुख्याधिकारी उमेश ढाकणे खरोखरंच जागले. यामुळे माझ्यासह प्रभागातील इतर नागरिकांना मोठे कुतूहल वाटले. आम्ही सर्वांनी मिळून मुख्याधिकाऱ्यांसह आलेले मा.न.से शेख मुहम्मद सादेख़ यांनी येथील जनतेच्या ज्या-ज्या तक्रारी आहेत त्या अत्यंत धीर गंभीरतेने ऐकल्या शिवाय प्रभाग क्रमांक 12 मधील पाच रस्ते व नाल्यांसहित प्रभागातील मोठ्या नाल्यांवर पूलांचा प्रश्न ही मार्गी लावण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन ही यावेळी दिले. यामुळे प्रभागातील नागरिकांनी मुख्याधिकारी यांचे विशेष आभार मानले. आणि मुख्याधिकाऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन पाहून त्यांच्या कार्यकाळात या प्रभागात आवश्यक असलेले रस्ते, नाल्या व पुलांचे कार्य सुरू होऊन निश्चितपणे पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मुख्याधिकारीं उमेश ढाकणे सोबत समाजसेवक शेख मोहसीन, मा.न.से.शेख मुहम्मद सादेख़, मुजीब काज़ी, आबेद भाई, नज़ीर भाई, शाहरुख भाई आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter