ऋषिकेश शेलार चा लुक पाहून चाहते घायाळ

Beed

ऋषिकेश शेलार चा लुक पाहून चाहते घायाळ

बीड/वार्ताहर 

एका मिनिटात ऋषिकेश च्या फोटोला हजारो लाईक .आपल्या सर्वांचा लाडका आर.जे. ऋषी सोशिअल मीडियावर सध्या जास्तच चर्चेत आहे . तो त्याच्या हटके लुक मुळे . अक्षरशः ऋषिकेशला पाहून चाहते त्याच्या प्रेमात पडलेत . त्याचे कारण आहे ऋषिकेश चा आगामी काळात येणारा चित्रपट प्रेम . ऋषिकेश प्रेम ह्या चित्रपटात दिगंबर ही आमदार पुत्र व्हिलन ची भूमिका साकारतोय . ऋषिकेश नेहमीच आपल्या हटके स्टाईल ने चर्चेत राहिला आहे . त्याचा आवाज नकळतच सर्वांना आपलासा करून जातो . 

त्यांच्या चेहऱ्यावरचं मनमोहक हसू चाहत्यांना नकळत घायाळ करून जाते . आज पर्यंत ऋषिकेश फक्त आपल्याला टीव्ही आणि रेडिओ वरती ऐकायला आणि पाहायला मिळाला पण आता तो रातोरात स्टार झालाय . त्यांची तुलना चाहत्यांनी थेट टॉलीवूड अभिनेता पुष्पा फेम अल्लू अर्जुन शी केली आहे . दरम्यान बॉलिवूड मध्ये ही त्याचें चाहते झाल्याचे ,अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सांगितले आहे . काही जणांनी तर ऋषिकेश ची तुलना रणवीर सिंग बरोबर करायला सुरुवात केलीये. ऋषिकेश ने प्रेम ह्या चित्रपटातील पोस्टर लॉन्चिंग साठी हा लूक दिल्याचं कळतंय ,काहीही असो मात्र ऋषिकेश शेलार आता बडा स्टार झाला हे मात्र नक्क्की .

Sharing

Visitor Counter