मतीमंद निवासी विद्यालय येथे वॉटर फिल्टर भेट - संध्या भोसले
Beed

मतीमंद निवासी विद्यालय येथे वॉटर फिल्टर भेट - संध्या भोसले
बीड/प्रतिनिधी
मतीमंद निवासी विद्यालय संभाजी नगर, बार्शी रोड बीड येथे निवासी मतीमंद मुलांसाठी अॅक्वॉ मिनरल वॉटर फिल्टर मॉ साहेब प्रेरणा ऑर्गनायझेशनच्या बीड तालुका अध्यक्षा संध्या दिलीप भोसले यांनी मॉ साहेब प्रेरणा ऑर्गनायझेशनच्या संस्थापक अध्यक्ष अॅड.कु. प्रेरणा सूर्यवंशी यांच्या हस्ते फिल्टर सप्रेम भेट दिले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेनेचे मा.जिल्हा प्रमुख शिवसेनेचे अॅड.चंद्रकांतआप्पा नवले, अ.भा.मराठा महासंघाचे मराठवाडा उपाध्यक्ष नारायणराव थोरात, मॉ साहेब प्रेरणा ऑर्गनायझेनशनच्या तालुका सचिव सौ.सिमा शिलवंत, मुख्याध्यापक भांबरे सर, सच्चिदानंद शिंदे सर, कदम सर, साठे सर, यादव सर, मुळे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.








