ई-पीक पाहणी व पंतप्रधान सुक्षम अन्नप्रक्रिया उद्योग योजनेबाबत
ई-पीक पाहणी व पंतप्रधान सुक्षम अन्नप्रक्रिया उद्योग योजनेबाबत
जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखली संपन्न
बीड/वार्ताहर
ई पिक पाहणी, जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे , जिल्हाधिकारी कार्यालय बीड व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेवतीने जिल्हास्तरीय कार्यशाळा आज जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
आत्मनिर्भर भारत योजना अंतर्गत पंतप्रधान सुक्षम अन्नप्र क्रिया उद्योग योजनेची तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान विशेष कार्यक्रम तूर व उडीद पिकाखालील क्षेत्र वाढ व उत्पादकता (NFSM TMU-370) बाबत जिल्हास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी खरीप हंगाम-2022-2023 साठी ई-पीक पहाणीचा 100 टक्के पुर्ण करणेसाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित निवासी जिल्हाधिकारी संतोष राऊत, श्री बालाजी शेवाळे तहसीलदार ई-पिक जमावबंदी आयुक्त कार्यालय पुणे, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी माजलगाव श्री. सुरज मडके, उपविभागीय कृषी अधिकारी माजलगाव श्री वडखेलकर, तसेच सर्व तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक व महसूल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामविकासाचे सर्व अधिकारी कर्मचारी, सरपंच, वेगवेगळ्या स्वयंसहायता गटाचे अध्यक्ष, सचिव व प्रतिनिधी, व्यवस्थापक जिल्हा ग्रामीण बँक एल.डी.एम. श्री निनावे,कृषी उपसंचालक अरुण बनकर, तंत्रअधिकारी कु.शुभांगी ढगे तसेच जिल्हास्तरीय समिती मधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बालाजी शेवाळे तहसीलदार ई-पिक जमावबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांनी खरीप हंगाम-2022-2023 साठी ई-पीक पाहणी 100 टक्के पुर्ण करणेबाबत प्रशिक्षणाव्दारे मार्गदर्शन केले. या माध्यमातून सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना व रा.अ.सु.अ.योजने अंतर्गत तूर व उडीद पिकाचे क्षेत्र व उत्पादकता वाढ विशेष कार्यक्रम(NFSMTMU-370)-अतर्गत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेच्या प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी जिल्हाधिकारी महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. जेजुरकर यांनी स्वागत केले. कार्यशाळेत योजनांची सविस्तर माहिती व प्रस्ताविक तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत तूर व उडीद पीक क्षेत्र व उत्पादकता वाढ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन बीड जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा.श्री बी के जेजुरकर यांनी केले. तसेच खरीप पिकावरील कीड व रोग या बाबत डॉ.हनुमान गरुड कृषी विशेषज्ञ कृषिविद्या कृषी विज्ञान केंद्र खामगाव यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अर्जून चव्हाण, कृषी पर्यवेक्षक, शासकीय रोपवाटिका राजुरी नवगन यांनी केले.








