पी. जी. जावळे यांची अधिकारी महासंघाच्या महाराष्ट्राच्या कार्यकारणीवरराज्य संघटक म्हणून 2025 पर्यंत निवड

पी. जी. जावळे यांची अधिकारी महासंघाच्या महाराष्ट्राच्या कार्यकारणीवरराज्य संघटक म्हणून 2025 पर्यंत निवड
बीड/वार्ताहर
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक दि. 20 ऑगस्ट 2022 व 21 ऑगस्ट 2022 या दोन दिवशी मुंबई येथे न्युझीलँड हॉस्टेल वरळी गोरेगाव येथे महासंघाचे त्रैवार्षिक अधिवेशन पार पडले. सदरील अधिवेशनास महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शासनाच्या वेगवेगळ्या 70 खात्यातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अधिवेशनात बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून पुढे नमूद केलेले अधिकारी मुंबई येथे उपस्थित होते. पी. जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे, वरिष्ठ लेखाधिकारी पित्त विभाग महाराष्ट्र शासन पी. जी. जावळे,जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी, डॉक्टर साळवी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा डॉक्टर विजय देशमुख, अपर कोषागार अधिकारी सतीश घोळवे, अप्पर कोषागार अधिकारी जोरे, जिल्हा परिषदेचे लेखा अधिकारी जव्हेरी, पशुसंवर्धन अधिकारी तथा जिल्हाध्यक्ष पशुसंवर्धन अधिकारी संघटना डॉक्टर पी. डी. आघाव, महिला व बालकल्याण अधिकारी संजय कुलकर्णी आणि सहाय्यक लेखा अधिकारी कोषागार कार्यालय बीड नितीन जोशी
सदरील कार्यक्रमाला अनेक विभागाचे आयुक्त / सचिव अधिकारी यांनी उपस्थित राहून सर्व अधिका-या मार्गदर्शन केले. सदरील अधिवेशनात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर व मागण्यांवर विचार विनिमर्श होऊन अनेक बाबींवर ठराव मंजूर करण्यात आले. उदा. निवृत्तीचे वय 58 वरून 60 करणे नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, बक्षी समिती वेतन त्रुटी बाबतच्या खंड -2 अहवाल मंजुरी व तत्पर अंमलबजावणीची कार्यवाही, आश्वासित प्रगती योजना, ग्रेड पे 5400 च्या मर्यादा रद्द करणे व इतर अनेक बाबींवर ठराव मंजूर करण्यात आले.
त्याचप्रमाणे 2022 ते 2025 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. बीड जिल्ह्यातील माजी वरिष्ठ लेखाधिकारी पी.जी. जावळे यांची महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघावर महाराष्ट्राचे राज्य संघटक म्हणून एकमताने निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे डॉ.विजय देशमुख जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांची जनसंवाद सचिव तर श्रीमती मंजुषा लटपटे तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांची महिला सहचिटणीस म्हणून निवड करण्यात आली. या निवडी बाबत पी. जी. जावळे, डॉक्टर विजय देशमुख व मंजुषा लटपटे यांचे अधिकारी ,कर्मचारी व मित्रमंडळी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे. व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहे.








