शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात तैलचित्र-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विनंती मान्य
Beed

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात तैलचित्र-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विनंती मान्य
मुंबई/वार्ताहर
विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ही मागणी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मान्य केली.
यासंदर्भात विधानमंडळ सचिवालय पुढील तीन महिन्यात कार्यवाही करून विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात तैलचित्र लावेल, अशी घोषणा विधानसभाध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी केली. तसे निर्देशही त्यांनी संबंधिताना दिले.








