जादु टोना बोलुन फसवणूक करणाऱ्या महिलेला हद्दपार करा

जादु टोना बोलुन फसवणूक करणाऱ्या महिलेला हद्दपार करा
शेख नाजीया विरूध्द महिलांचा जिल्हा अधिकाऱ्यालयसमोर धरणे
बीड/प्रतिनिधी
कायद्याची कसलीही भिती नसलेल्या शेख नाजीया हिच्याविरूध्द ४० दिवसांत ३ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत . फसवणूक , जादूटोणा असे गुन्हे दाखल असलेल्या शेख नाजीया हिस तात्काळ हद्दपार करावे अशी मागणी महिला आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे . बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज १५ ते २० महिलांनी लाक्षणिक धरणे आंदोलन करत शेख नाजीया विरूध्द संताप व्यक्त - केला . जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , शेख नाजीया ही महिला गुन्हेगारी प्रवृत्तीची असुन आत्तापर्यंत तीने अनेकांना फसवले आहे . पोलीस आणि कायद्याची कसलीच भिती तिला नाही . त्यामुळेच सातत्याने तिच्याकडून लोकांची फसवणूक केली जात आहे . सदर महिलेस जिल्हा प्रशासनाने तात्काळ हद्दपार करावे अशी मागणी रईसोनीसा बेगम शेख अहेमद , शेख सबीया , शेख तन्वीर , शेख मुमताज यांच्यासह २० महिलांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत .








