समीर काझी यांच्या प्रयत्नाना मिळणार यश !

समीर काझी यांच्या प्रयत्नाना मिळणार यश !
बीड-उस्मानाबाद वक्फ कार्यालयासाठी मिळणार वीस लाख
औरंगाबाद/वार्ताहर
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बैठकीत आज अत्यंत महत्वाचे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले . पहिल्यांदाच २ ९ १ संस्थांच्या नोंदनीस मंजुरी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला . गेल्या अनेक वर्षा पासून प्रलंबित मुतवल्लींच्या नेमणुकी व मंडळात नियमित मुख्यकार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्तीचा ठराव ही मंजूर करण्यात आला . विशेष म्हणजे भूखंड माफियांना लगाम लावून वक्फच्या जमीनी भाडेतत्वावर देऊन महसूल वाढीचा महत्वपूर्ण ठराव घेण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष आमदारवजाहत मिर्जा यांनी एका पत्रपरिषदेत दिली . तर वक्फ मंडळाचे सदस्य समिर काझी यांच्या प्रयत्नांमुळे बीड आणि उस्मानाबाद येथील वक्फच्या नविन कार्यालयासाठी प्रत्येकी २० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे . मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधणी येथे आज सकाळी मंडळाच्या तीन दिवसीय बैठक मंडळाचे अध्यक्ष वजाहत मिर्जा यांच्या अध्यक्षते खाली सुरुवात झाली आहे








