आ.भा. ब्राह्मण महासंघाचा रेणुकाई पुरस्कार अॅड.संगिताताई चव्हाण यांना प्रदान

आ.भा. ब्राह्मण महासंघाचा रेणुकाई पुरस्कार अॅड.संगिताताई चव्हाण यांना प्रदान
विविध मान्यवरांच्याहस्ते नांदेड येथे पुरस्कार देवून केला गौरव
बीड/प्रतिनिधी
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तसेच विविध कार्यात नावलौकिक असणार्या व्यतींना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या संघटनेकडून दरवर्षी पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. यावर्षी बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूरांच्या कुटूंब जन्मघेवून राज्यात नावलौकीक करणार्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या तथा शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अॅड संगिताताई चव्हाण यांना रेणूकाई पुरस्कार प्रदान करून ब्राम्हण महासंघाकडून गौरव करण्यात आला.
यावेळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, आंतरराष्ट्रीय व्याख्याते डॉ.सचिदानंद शेवडे, आ.भा.शिक्षण संस्था अध्यक्ष बाळासाहेब पांडे, महापौर जयश्री निलेश पावउे, डॉ.उमेश भालेराव, गणेश कुलकर्णी, देशमुख, शेख, जयराम धोंडगे, किसन फटाले, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष निखिल लातूरकर, जिल्हाध्यक्ष विजय जोशी यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कुठलाही राजकीय वसा नसतांनाही आपल्या स्वतःच्या पायावर एक वेगळी ओळख व अस्तित्व निर्माण करत ऊसतोड कामगारांच्या मुलीनेही राजकरण हे कुठल्या घराणेशाहीची मतेदारी नसल्याचे दाखवून देत महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण करण्यात आली आहे. तांड्याच्या खडतर प्रवासानंतर जिल्ह्यातील राजकारणात पाऊल रुजवून घट करत राज्याच्या राजकारणात एक ओबीसी महिला म्हणून आश्वासक चेहरा बनविण्याचे काम केल्याने नांदेडच्या अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या संघटनेकडून त्यांच्या कार्याची देखल घेत रेणुकाई पुरस्कार देवून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आले. एका बंजारा समाजातील वाघीणीचा ब्राम्हाण महासंघाच्या संघटनेकडून सन्मान होणे ही समाजासाठी गर्वाची बाब आहे. अॅड. संगिताताई चव्हाण यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.








