अप्पर पोलिस अधिक्षक सुनील लांजेवार यांची लिंबागणेशला भेट

अप्पर पोलिस अधिक्षक सुनील लांजेवार यांची लिंबागणेशला भेट
मयुरेश्वराचे घेतले दर्शन, भालचंद्र गणेशाची केली आरती
बीड/प्रतिनिधी
बीडचे अप्पर पोलिस अधिक्षक आणि गणेशभक्त असलेले सुनील लांजेवार यांनी शनिवारी दुपारी तीन वाजता लिंबागणेश येथील एक गाव एक गणपतीची तीनशे वर्षाची परंपरा असलेल्या मयुरेश्वर गणेश व पुरातन भालचंद्र गणपतीचे मनोभावे दर्शन घेवुन आरती केली.
अप्पर पोलिस अधिक्षक यांनी शनिवार ३ सप्टेंबर २०२२ रोजी लिंबागणेश येथे भेट दिली. सुरूवातील गावातील सरकारवाडा येथे प्रतिष्ठापीत करण्यात आलेल्या मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी लांजेवार यांचा सत्कार लिंबागणेश ग्रामपंचायतचे माजी सदस्य श्रीकृष्ण कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी दिनेश लिंबेकर , सरपंच स्वप्नील गलधर, डॉ.गणेश ढवळे, मुकुंद कानिटकर, श्रीनिवास कानिटकर, माजी सरपंच बाळकृष्ण मुळे ,शंकर वाणी , पोलिस उप निरीक्षक विलास जाधव आदी उपस्थीत होते. यांनतर लांजेवार यांनी गावातील भालचंद्र गणपतीच्या मंदिरास भेट देवुन मंदिराची पुरात माहिती जाणुन घेतली. त्यांच्या हस्ते भालचंद्र गणपतीची आरती करण्यात येवुन पुजारी श्रीकांत जोशी, वरद जोशी यांनी सत्कार केला.त्यांनतर लिंबागणेश येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच स्वप्नील गलधर यांच्या वतीने लांजेवार यांचा सत्कार करण्यात आला.
सोमवारच्या विसर्जनासाठी १०० पोलिसांचा बंदोबस्त
लिंबागणेश येथे एक गाव एक गणपतीची परंपरा असलेल्या मयुरेश्वर गणपतीची सोमवार ५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी महाआरतीनंतर विसर्जन मिरवणुक निघणार असल्याने येथील पोलिस चौकीत पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतला. सोमवारी लिंबागणेश गावात यात्रा असल्याने गणेश विसर्जनासाठी शंभर पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक सुनील लांजेवार यांनी दिली.








