पीएम किसान योजना लाभासाठी ७ सप्टेबरपर्यंत e-KYC करणे गरजेचे- जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

पीएम किसान योजना लाभासाठी ७ सप्टेबरपर्यंत e-KYC करणे गरजेचे- जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा
जिल्हयातील ३,१५,२७९ लाभार्थ्यांचे e-KYC पूर्ण झाले जिल्हयातील १,६४,६११लाभार्थ्यांनी अद्याप e-KYC अद्याप केलेली नाही
बीड/वार्ताहर
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतील लाभार्थ्यांनी दि.१२ सप्टेबर २०२२ रोजी वितरीत होणारा १४ वा हप्ता मिळण्याकरीता,पात्र लाभार्थ्यांनी e-KYC दि.७ सप्टेबर २०२२ पर्यंत पुर्ण करण्याबाबत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आवाहन केले आहे
केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील कालावधीचा लाभ मिळण्यासाठी e-KYC प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक केली आहे. ज्या लाभार्थ्यांनी e-KYC केली नाही, अशा लाभार्थ्यांचा पुढील लाभ थांबविला जाणार आहे.
e-KYC प्रमाणीकरणाची प्रक्रिया अतिशय सोपी असून, e-KYC करण्यासाठी OTP किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी खालील दोन पध्दतीने e-KYC करता येईल. लाभार्भी स्वतः https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील Farmer Corner या टॅबमध्ये किंवा PMKisan अँपद्वारे OTP द्वारे मोफत करता येईल.
अथवा आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे e-KYC प्रमाणीकरण करता येईल.तसेच ग्राहक सेवा केंद्र (CSC) येथे प्रति लाभार्थी रूपये १५/- दराने e-KYC प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल.
जिल्हयातील 4,79,890 पैकी ३,१५,२७९ लाभार्थ्यांचे e-KYC पूर्ण झाले आहे. तर १,६४,६११ लाभार्थ्यांनी e-KYC अद्याप केलेली नाही, अद्याप e-KYC न केल्याने योजनेचा पुढील कालावधीचा लाभ थांबविला जाणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतील ज्या लाभार्थ्यांनी e-KYC अद्याप केलेली नाही, त्यांनी दि.०७ सप्टेबर 2022 पुर्वी वरील दोन पध्दतीपैकी एका पध्दतीने e-KYC प्रक्रिया पुर्ण करून योजनेचा पुढील लाभ सुरळीत करून घेण्याबाबत शासनाने कळविले असून त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे .








