संविधानाच्या रक्षणासाठी १५ सप्टेंबर २०२२ रोजी महिला उतरणार रस्त्यावर मुक निषेध मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हा

Beed

संविधानाच्या रक्षणासाठी १५ सप्टेंबर २०२२ रोजी महिला उतरणार रस्त्यावर मुक निषेध मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हा

बीड/प्रतिनिधी

देशात सध्या देशाचे राजकारण होत आहे, दररोज अल्पसंख्यांक समाजावर हल्लेव अन्यायाचे प्रकरण समोर येत आहेत. मुस्लीम धर्माचे पैगंबर यांचे विरुद्ध टिपणी करुन मुस्लीम समाजाची भावना दुखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर अझादीच्या अमृत महोत्सवाचे दिवशी गुजरात शासनाने लोकशाहीचा खुन करुन गुजरात दंगलीतील पिडीत बिलखीज बानो चे 11 बलात्काऱ्यांची शिक्षा माफ करुन बिलखीज व भारताची असंख्य पिडीतांवर पुन्हा अन्याय केला आहे म्हणून दिनांक 15 सप्टेंबर 2022 गुरुवार रोजी बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महिलांचा भव्य मुक निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने होत असलेले या मोर्चाचे नेतृत्त्व मुस्लीम विद्यार्थीनी करणार आहेत. हा मोर्चा बीड शहरातील किल्ला मैदान (मिल्लीया कॉलेज) येथुन सुरु होऊन बलभिम चौक - कारंजा रोड - राजुरी वेस बशिरगंज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या ठिकाणी मुस्लीम विद्यार्थीनी मोर्चाला संबोधीत करणार आहेत व जिल्हाधिकारी, बीड यांचे मार्फत राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन सादर करणार आहोत.

1 ) या निवेदनात पैगंबर मोहम्मद (स) यांच्य विरोधात टिपणी करणाऱ्या विरुध्द कठोर कायदा करणे. 2) बिलखीज बानोच्या आरोपींची माफ केलेली शिक्षा रद्द करुन पुन्हा त्यांना शिक्षा देणे व देशात बलात्काराच्या घटनेवर आळा घालण्या करीता फास्ट ट्रॅक कोर्ट व बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी.

3) जागतीक स्तरावरील मुस्लीम धर्मगुरु मौलाम कलीम सिद्दीकी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप

मागे घेऊन त्यांची सुटका करण्यात यावी.

4) आसाम या राज्यात मदरसा विरुध्द होत असलेली अन्याय कारक कार्यवाही थांबवुन पाडण्यात आलेले मदरसे पुन्हा बांधण्यात यावेत.

5) भारतात अल्पसंख्यांक समाजावर होत असलेले अन्याय व हल्ले रोखण्या करीता अॅट्रॉसिटी सारखा

कायदा करण्यात यावा.

इत्यादी मागण्या करण्यात येणार आहेत. बीड शहरा सोबतच जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी, माजलगाव, पाटोदा, आष्टी, आणि धारुर या ठिकाणीही उद्या 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 वा. महिलांचा मुक निषेध मोर्चा निघणार आहे. धारुर मध्ये हे मोर्चा नगर परिषद समोरुन सुरु होणार. तालुक्याच्या ठिकाणी तहसिल कार्यालयावर हे मोर्चे धडकणार आहेत. या मोर्चाचे निमीत्ताने जिल्ह्यातील प्रत्येक घरावर काळे झेंडे लावुन निषेधही व्यक्त केला जात आहे. या महिला मुक निषेध मोर्चात बहुसंख्येने महिला भगिणींनी सहभागी व्हावे अशी विनंती संविधान बचाव संघर्ष समिती, बीड च्या वतीने करण्यात आली आहे.

Sharing

Visitor Counter