माजलगाव येथील ऊसतोड मजूरांच्या महामेळाव्यास बहुसंखेने उपस्थित राहा -अरूण पवार, बीभीषण राठोड

माजलगाव येथील ऊसतोड मजूरांच्या महामेळाव्यास बहुसंखेने उपस्थित राहा -अरूण पवार, बीभीषण राठोड
बीड/प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर आवाज उठवित गोर सेना व श्रमिक ऊसतोड कामगार संघटनेच्यावतीने कामगार, मुकादम, वाहन मालक यांच्या ज्वलंत मागण्यांसाठी माजलगाव येथे गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरूण भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील ऊसतोड मजूर,मुकादम व वाहन मलकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष अरूण चव्हाण व गोर सिकवाडीचे बीभीषण राठोड यांनी केले आहे.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही ऊसतोड मजूरांचे हाल अपेष्ठा सुरूच असून राजकारण्याकडून त्यांचे फक्त मतापुरते वापर करत त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. तरी आता एक होण्याची गरज आली असून तुमच्या प्रश्नासाठी तुम्हालाच लठा उभारण्याची गरज असल्याने गोर सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष अरूण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लठा उभारण्यासाठी ऊसतोड मजूर, मुकादा व वाहन मालकांनी उभा राहण्याची गरज असल्याने आज दि.15 सप्टेंबर 2022 रोजी होत असलेल्या माजलगाव येथील महामेळाव्यास बहुसंख्येंने उपस्थित राहून ऊसतोड मजूर,मुकादम व वाहन मालकांची ऐकी दाखविण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष अरूच पवार व गोर सिकवाडीचे बीभीषण राठोड यांनी केले आहे.








