जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
Beed
जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
बीड/वार्ताहर
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) दयानंद जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, उपविभागीय अधिकारी तथा नगर परिषद प्रशासक नामदेव टिळेकर, तहसीलदार सुहास हजारे यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.








