बीड जिल्हा रोटरी कॉप्सच्या अध्यक्षपदी संतोष पवार सचिवपदी मोहिते तर कार्याध्यक्षपदी दिपक कर्नावट

बीड जिल्हा रोटरी कॉप्सच्या अध्यक्षपदी संतोष पवार सचिवपदी मोहिते तर कार्याध्यक्षपदी दिपक कर्नावट
बीड/प्रतिनिधी
रोटरी कॉप्सच्या पदाधिकारी निवडीसाठी जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबच्या आजी-माजी अध्यक्षांची वार्षिक सभा नुकतीच झाली. यावेळी पुढील दोन वर्षांसाठी (2022-24) बीड जिल्हा रोटरी कॉप्सच्या अध्यक्षपदी रोटरी क्लब ऑफ बीडचे संतोष पवार, सचिवपदी अंबाजोगाई सिटी क्लबचे संतोष मोहिते, कार्याध्यक्षपदी बीड सिटी क्लबचे दीपक कर्नावट तर माजलगाव क्लबचे निळकंठ साबळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लब्समधील समन्वय तसेच समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी एकत्रीत प्रयत्न करण्याकरिता रोटरी कॉप्स कार्यरत असते. या रोटरी कॉप्सच्या पदाधिकार्यांची निवड करण्यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी संतोष पवार, सचिवपदी संतोष मोहिते, कार्याध्यक्षपदी दीपक कर्नावट व उपाध्यक्षपदी निळकंठ साबळे यांची निवड करण्यात आली.
मावळते अध्यक्ष प्रवीण देशपांडे, सचिव आनंद कर्नावट यांनी नुतन पदाधिकार्यांना पदभार सोपवला. तत्पूर्वी सुरेश लड्डा यांनी अध्यक्षाचे नाव सुचवले तसेच प्रवीण चोकडा यांनी सचिवांच्या नावास अनुमोदन दिले.
या प्रसंगी माजी प्रांतपाल हरीश मोटवानी व कार्याध्यक्ष सुर्यकांत महाजन यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. या बैठकीस रोटरी क्लबचे आजी-माजी अध्यक्ष उपस्थित होते. या निवडीबद्दल संतोष पवार यांचे अभिनंदन केले जात आहे.








