आखेर डॉक्टरारचा मृतदेह मिळाला!
Beed

आखेर डॉक्टरारचा मृतदेह मिळाला!
बीड/वार्ताहर
माजलगाव येथील धरणात रविवारी ( ता . १८ ) पोहण्यासाठी गेलेले डॉ . दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचा मृतदेह २४ तासानंतर मिळाला आखेर मिळाला.परंतु त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेले एनडीआरएफचे दोन जवान या तलावात अडकले होते . यातील एका जवानाला बाहेर काढण्यात यश आले तर दुसऱ्या जवानाला आपला जिव गमवावं लागलं.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होते तर त्यांच्या शोध मोहिमेसाठी स्वत : जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा धरणात उतरून एनडीआरएफच्या जवानांना आधार देत होते . तब्बल २४ तासानंतर बेपत्ता झालेल्या डॉक्टराचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले परंतु एका जवानाचा दुर्दैवी जीव गेल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.








