पिक विम्या च्या 25 टक्के अग्रीम मिळण्यासाठी संतोष हांगे हे उच्च न्यायालया च्या दरबारी!

पिक विम्या च्या 25 टक्के अग्रीम मिळण्यासाठी संतोष हांगे हे उच्च न्यायालया च्या दरबारी!
बीड/वार्ताहर
शासनाच्या आलेल्या पिक विम्याच्या यादीतून नांदूर घाट महसूल मंडळ हे पूर्णपणे वगळण्यात आले होते म्हणून नांदुर घाट जिल्हा परिषद सदस्य माजी समाज कल्याण सभापती मा संतोष दादा हंगे हे काल शेतकऱ्यांना 25% अग्रीम मिळावा म्हणून प्रत्येक गावातून एक शेतकरी मित्रांना घेऊन उच्च न्यायालय औरंगाबाद दाद मागण्यांसाठी दाखल झाले व न्यायालयात त्या विरोधात रिट दाखल करण्यात आली व तसेच पूर्ण शिष्टमंडळाने माननीय केंद्रकर साहेब यांची भेट घेतली मा साहेबानी या बद्दल ची सखोल चौकशी करून न्याय देऊ असे आश्वासन दिले या वेळी सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता मा संतोषदादा हंगे तसेच नांदुर घाट चे सरपंच पांडुरंग चांगण व पत्रकार अमोल जाधव व प्रत्येक गावातून एक शेतकरी असे शिष्टमंडळ काल औरंगाबाद येथे हजर होते








