सांगवी पाटण येथील दोन युवकांचा ज्योत आणण्यासाठी जाताना मोटरसायकल अपघातात मृत्यू 

Beed

सांगवी पाटण येथील दोन युवकांचा ज्योत आणण्यासाठी जाताना मोटरसायकल अपघातात मृत्यू 

   आष्टी/प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील युवक तुळजापूर येथून ज्योत आणण्यासाठी जात असतानाच येरमाळा येथील हायवे रस्त्यावर युवकांच्या मोटरसायकलला अपघात झाल्याने दोन युवकांचा जाग्यावरच मृत्यू झाल्याचे समजते .

   तुळजापूर येथून ज्योत आणण्यासाठी अमोल सुरेशराव खिलारे ( वय-३८) उपसरपंच .व महेश भास्करराव भोसले (वय -३१ ) आरोग्य सेवक असे अपघातात मृत्यू पावलेले युवक आहेत . या अपघातात सांगवी पाटण येथील दोन युवकांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून या दुर्घटनेने गावा वरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे .

Sharing

Visitor Counter